ETV Bharat / state

दुष्काळाच्या झळा; नंदुरबारमध्ये गाढवावरुन होतो नागरिकांना पाणीपुरवठा - पाणी पुरवठा

नंदुरबारमध्ये प्रशासन गाढवाची मदत घेऊन नागरिकांना पाणीपुरवठा करत आहे.

गाढवावरुन पाणी नेताना नागरिक
author img

By

Published : May 21, 2019, 4:07 PM IST

Updated : May 22, 2019, 3:47 PM IST

नंदुरबार - राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने टँकर आणि रेल्वेची मदत घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, आता नंदुरबारमध्ये गाढवाची मदत घेत पाणी पुरवठ्याची आगळी वेगळी योजना प्रशासनाने तयार केली आहे.

गाढवावरुन पाणी नेताना नागरिक

जिल्ह्यातल्या कुवलीडाबर गावातील भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. मात्र, अतिदुर्गंम अशा डोंगर दऱ्यात वसलेल्या या गावाला जाण्यास रस्ताच नसल्याने गावकरी आणि प्रशासनाने अखेर पाणी पुरवठ्यासाठी एक आगळी वेगळी योजना सुरू केली. या गावात गाढवाच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी गावातील तब्बल पंधरा गाढवांच्या माध्यमातून पायथ्याशी असलेल्या रापापूर गावातून गाढवांवर पाणी लादून कुवली डाबर ग्रामस्थांना पाणी पोहचवले जात आहे. गावातील पंधरा गाढवे रोज प्रत्येक खेपेला प्रत्येकी ३० लीटर पाणी वाहून घेवून जातात. दिवसातून २ खेपांच्या माध्यमातून डोंगरदऱ्यांत वसलेल्या कुवली डाबर गावाला जेमतेम ९०० लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी प्रत्येक खेपेमागे गाढवाला ७५ रुपये इतका रोज शासनाकडून अदा केला जात आहे. त्यामुळेच पाणी टंचाई निवारणासाठी गाढवाद्वारे पाणी पुरवठा होणार कुवली डाबर हे राज्यातील पहिलेच गाव ठरले आहे.

पाण्याची ने-आण ज्या रस्त्यावरुन होत आहे तो रस्ता अतिशय खडतर आहे. त्यामुळे या ठिकाणी ही गाढवे अनेक वेळा पडताना दिसत आहे. साडे तीनशे लोकसंख्या असलेल्या या गावात ३ लीटर प्रती दिन प्रती व्यक्ती इतकच पाणी उपलब्ध होत आहे. तर दुसरीकडे त्यांची जनावरे ताटली भर पाणी पिवून गुजारा करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जनावरांसाठी चारा छावणी आणि या गावाला रस्ता दिल्यास, अशा संकटांना वारंवार सामारे जावे लागणार नाही, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

फीड फटीपी RMH_21_MAY_NDBR_WATER_ON_DONKEY_PKG_VI_BYTE

Anchor:-राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन प्रशासनाने टँन्कर पासुन रेल्वेची देखील मदत घेतल्याचे अनेक उदाहरण आहेत. मात्र आता पाणी पुरवठ्यासाठी गाढवाची मदत घेत पाणी पुरवठ्याची आगळी वेगळी योजना प्रशासनाने तयार केली आहे. पाहुयात गाढव पाणी पुरवठा योजनेचा हा विशेष वृत्त

Voनंदुरबार जिल्ह्यातल्या कुवलीडाबर गावातील भीषण पाणी टंचाईचे वास्तव आणल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. मात्र अतिदुर्गम अशा डोंगर दऱयात वसलेल्या या गावाला जाण्यास रस्ताचत नसल्याने गावकरी आणि प्रशासनाने अखेर पाणी पुरवठ्यासाठी एक आगळी वेगळी योजना सुरु केली. हो गाढवाच्या सहाय्याने कुवली डाबर मध्ये सुरु झाली आहे पाणी पुरवठा करण्याची ही मोहीम. या गावातील तब्बल पंधरा गाढवांच्या माधम्यातुन पायथ्याशी असलेल्या रापापुर गावातुन गाढवांवर पाणी लादुन कुवली डाबर ग्रामस्थांची तहाण भागावल्या जात आहे. गावातील पंधरा गाढव रोज प्रत्येक खेपेला प्रत्येकी तीस लीटर पाणी वाहुन घेवुन जात आहे. दिवसातुन दोन खेपांच्या माध्यमातुन डोंगरदऱयांत वसलेल्या कुवली डाबर गावाला जेमतेम नऊशे लीटर पाणी पुरवठा केल्या जात आहे. यासाठी प्रत्येक खेपेमागे गाढवाला 75 रुपये इतका रोज शासनाकडुन अदा केल्या जात आहे. त्यामुळेच पाणी टंचाई निवारणासाठी गाढवाद्वारे पाणी पुरवठा होणार कुवली डाबर हे राज्यातल पहिल गाव ठरल आहे.

बाईट - खेमजी वसावे - ग्रामस्थ - कुवली डाबर

Voही पाण्याची ने आण खर तर अशा थरकाप करणाऱया रस्त्यावरुन होत आहे. जिथे ही गाढवे देखील अनेक वेळा पडतांना दिसत आहे. पण मुकी गाढव आपला त्रास सांगणार तरी कशी, आणि ग्रामस्थांची पाण्याची तहाण भागवण्यासाठी त्यांच्या सोबतची ग्रामस्थ मग गाढवांना टेकु देत हा खडतर प्रवास साध्य करत आहे. खर तर साडे तीनशे लोकसंख्या असलेल्या या गावात हे पाणी म्हणजे तीन लीटर प्रती दिन प्रती व्यक्ती इतकच मात्र काही नसल्या पेक्षा थोड असलेले बरे,यातुन ते जमेतेम आपली तहाण भागवत आहे. तर दुसरीकडे त्यांची जणावरे ताटली भर पाणी पिवुन गुजारा करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जनावरांसाठी चारा छावणी आणि या गावाला रस्ता दिल्यास अशा संकटांना वारंवार सामारे जावे लागणार नाही असे मत ग्रामस्थांसोबत जाणकार व्यक्त करत आहे.

बाईट - किरण वसावे - ग्रामस्थ - कुवली डाबर
बाईट - प्रतिभा शिंदे - सामाजीक कार्यकर्त्या - लोकसंघर्ष मोर्चा 

Vo गाढवावर पाणी पुरवठा करणे ही काही महाराष्ट्रासाठी भुषावह बाब नाही, मात्र दुष्काळ आणि टंचाईने आता सातपुड्याच्या दऱया खोऱ्यात देखील आपल जाळ पसरवल्याने या भीषण परिस्थीतीवर मात करण्यासाठी प्रशासनासोबत आता नागरीकांनी देखील पुढाकार घेण्याची गरज आहे. डोगर दऱयात पडलेले पाणी तिथच जिरवुन झाडे वाढवुन सातपुड्याला  गत वैभव दिल्यास याच गाढवांना चांगली चराई मिळेल आणि पाणी देण्या एवजी ते पाणी पिण्याचे काम करेल.. पण यातुन निसर्गाच्या बदलाची चाहुल ओळखणे गरजेचे हे निश्चित   
Last Updated : May 22, 2019, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.