नंदुरबार - शहर आणि परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सकाळी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली.
हेही वाचा... साताऱ्यात बोअरवेल्सच्या ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर उष्णता देखील वाढली होती. शुक्रवारी सकाळी अचानक पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अवकाळी पावसाचा फटका मिरची व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.