नंदुरबार - जिल्ह्यात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ४० हजार घरकुलांचे उद्दिष्ट शासनाला पाठवले होते. त्यापैकी ३४ हजार ५१५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या घरकुलाद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांचा विकास होण्यात मोठी मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यभरातून नंदुरबार जिल्ह्याला प्राप्त झालेल्या घरकुलांचा आकडा सर्वाधिक आहे. जिल्हा ग्रामीण योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, आणि रमाई आवास योजना या अंतर्गत लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येतात. त्याचबरोबर घरकुल लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत ९० दिवसांची मजुरी १८ हजार रुपयेही देण्यात येतात.