ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये दोन मोबाईल स्वॅब प्रयोगशाळा होणार कार्यान्वित; 150 खाटांचे ऑक्सिजन रुग्णालय सज्ज- जिल्हाधिकारी

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चार शहरांमध्ये आठ दिवसांची कडक संचारबंदी लागु केली होती. या संचारबंदीचा अखेरचा दिवस असल्याने मध्यरात्री 12 वाजेपासून संचारबंदीला शिथीलता देण्यात आली आहे. 31 जुलै ते 3 ऑगस्ट यादरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. त्यानंतर दि.4 ऑगस्टपासून जिल्ह्यात सर्व आस्थापना व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 4 यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. परंतु शहरी भागात रविवारी लागु केलेला जनता कर्फ्यु कायम राहील. अशी माहिती  जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

Swab test lab
Swab test lab
author img

By

Published : Jul 30, 2020, 11:24 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील चार शहरांमध्ये लागू केलेल्या संचारबंदीचा आज (गुरुवार) अखेरचा दिवस असून 31 जुलैपासून संचारबंदीत सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर शिथीलता देण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नंदुरबार शहराकरिता दोन मोबाईल स्वॅब तपासणी प्रयोगशाळेची सुविधा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 9 ऑगस्टला आदिवासी गौरव दिनानिमित्त जिल्हा महिला व बालकल्याण रूग्णालयात 150 बेडची सुविधा असलेल्या ऑक्सिजन रूग्णालयाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चार शहरांमध्ये आठ दिवसांची कडक संचारबंदी लागु केली होती. या संचारबंदीचा अखेरचा दिवस असल्याने मध्यरात्री 12 वाजेपासून संचारबंदीला शिथीलता देण्यात आली आहे. 31 जुलै ते 3 ऑगस्ट यादरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. त्यानंतर दि.4 ऑगस्टपासून जिल्ह्यात सर्व आस्थापना व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 4 यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. परंतु शहरी भागात रविवारी लागु केलेला जनता कर्फ्यु कायम राहील. अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला. कोरोना नमुन्यांच्या तपासणीसाठी अ‍ॅन्टीरॅपीडसह दोन प्रकारच्या किट वापरण्यात आल्या. शासनाने नंदुरबार जिल्ह्यासाठी 500 किट दिल्या होत्या. परंतु आणखीन 6 हजार किटची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आतापर्यंत 4 हजार नमुने तपासणी आल्याने त्यात 500 हुन अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील 330 जण बरे होवुन 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 24 तासात 12 तर 48 तासात 8 अशा एकूण 20 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी व शासनाच्या नियमांच्या पालनासह आता जिल्ह्यातील नागरिकांनी नमुने देण्यासाठी स्वतःहुन पुढे येण्याची गरज आहे. यासाठी नंदुरबार व शहादा येथे सेंटर सुरू करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात दोन मोबाईल स्वॅब तपासणी शाळेला मान्यता दिली असून लवकरच हे पथक कार्यान्वित होईल. या पथकाने घेतलेले स्वॅब दोन ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 30 हजार रुपये किंमतीचे इंजेक्शन रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी असून जिल्ह्या करिता 10 इंजेक्शन प्राप्त झाले होते. त्यातील पाच इंजेक्शनचा उपयोग करण्यात आला आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण रूग्णालयात 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधुन स्वतंत्र 150 खाटांचे अद्यावत ऑक्सिजन रूग्णालय सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहादा, तळोदा येथेही रुग्णालय सुरू करण्यात येणार असून जिल्ह्यात एकूण 800 खाटांचे रुग्णालये कोविडसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे.

तालुक्यातही नमुने तपासणीसाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात 80 लाखांची आरटीपीसीआर स्वतंत्र लॅब तयार करण्याचा प्रयत्न आहे. 60 लाखांच्या आरटीपीसीआर किटस्ची मागणी असणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी आता स्वतःहुन नमुने देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

जिल्ह्यात ‘अनलॉक’

जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी 30 जुलैच्या मध्यरात्री संचारबंदीचा कालावधी संपुष्टात येत असल्याने संचारबंदीत शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. चारही शहरात 31 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ठिकाणी वैद्यकीय सुविधा, मेडीकल स्टोअर पुर्णवेळ सुरु राहतील. त्या व्यतिरिक्त सर्व आस्थापना, दुकाने हे सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे. 4 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने हे सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास मुभा राहील. जिल्ह्यातील शहरी भागात प्रत्येक रविवारी सकाळी 9 पासून मध्यरात्री पर्यंत जनता कर्फ्यू (संचारबंदी) लागू राहील. केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना आपल्या घराबाहेर निघण्यासाठी मुभा राहील, तथापि नागरिकांजवळ सबळ पुरावे असणे बंधनकारक असेल. रविवारी शहरातील वैद्यकीय सुविधा, मेडीकल स्टोअर पुर्णवेळ सुरु राहतील. दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती राहील. ज्या ठिकाणी गर्दी होईल अथवा सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नसतील त्या ठिकाणी संबधित ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाकडून तात्काळ दुकाने बंद करण्यात येतील. आगामी सण उत्सव कालावधीत प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.