ETV Bharat / state

अस्वलाच्या हल्ल्यात दोन शेतकर्‍यांसह बालक गंभीर जखमी; तळोदा तालुक्यात पसरली दहशत - नंदुरबार जिल्हा रुग्णालय

शेतात जाणार्‍या दोन शेतकर्‍यांसह 11 वर्षीय बालकावर अस्वलाने हल्ला केल्याने खळबळ उडाली. या घटनेतील गंभीर जखमी शेतकऱ्यांसह बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bear
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी बालक
author img

By

Published : May 21, 2020, 12:47 PM IST

नंदुरबार - ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात जाणार्‍या दोन शेतकर्‍यांसह 11 वर्षीय बालकावर अस्वलाने हल्ला केल्याने खळबळ उडाली. ही घटना तळोदा तालुक्यातील बेडापाडा येथे बुधवारी सकाळी घडली. अस्वलाच्या हल्ल्यात दोन्ही शेतकर्‍यांसह बालक गंभीर जखमी झाला आहे. नारायण गणा वळवी, अशोक चंदू तडवी अशी शेतकऱ्यांची तर अनिल जयसिंग वसावे असे त्या जखमी बालकाचे नाव आहे.

तळोदा तालुक्यातील बेडापाडा येथील शेतकरी नारायण गणा वळवी (वय 58) हे काल सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी बोअरमध्ये मोटार टाकत होते. यावेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अस्वलाने त्यांच्या कंबरेजवळ लचके तोडले. त्यानंतर शिवारातील शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी जाणार्‍या शेतकरी अशोक चंदू तडवी (वय 30) यांच्यावरही अस्वलाने हल्ला करत डाव्या पायावर चावा घेत जखमी केले. या दोन्ही शेतकर्‍यांनी आरडाओरड करत गावाच्या दिशेने जीवमुठीत घेवून पळ काढला.

यावेळी गावाकडून येत असलेल्या अनिल जरसिंग वसावे (वर 11) रा बालकावर देखील अस्वलाने हल्ला केला. हे तिघेही आरडाओरड करत असल्याचे पाहताच ग्रामस्थांनी हातात काठी, डेंगारे घेत त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. आरडाओरड केल्यावर अस्वलाने तेथून धुम ठोकली. अस्वलाच्या हल्ल्याने शेतकरी नारायण गणा वळवी, अशोक चंदू तडवी यांच्यासह अनिल जयसिंग वसावे या बालकाच्या डोक्यावर, ओठावर, छातीवर, पाठीवर अस्वलाने ओरबडल्याने जखमा झाल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी अनिल वसावे याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता शेतकऱ्याचा मृत्यू

तीन दिवसांपूर्वीच मोहीदा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना काल पुन्हा अस्वलाने दोन शेतकर्‍यांसह एका बालकावर हल्ला केला आहे. त्यामुळे या परिसरात दहशत पसरली आहे. तळोदा तालुक्यातील पश्‍चिम भागात अस्वलाचा अधिक वावर असून वाल्हेरी, ढेकाटी, अमोनी, इच्छागव्हाण, राजविहीर, दलेलपूर, बुधावल, सोमावल, कुंडलेश्‍वर, शिर्वे रा भागात अस्वलासह बिबट्याचा संचार सुरु असतो. वनविभागाने बिबट्या व अस्वलाला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.