ETV Bharat / state

तब्बल 61 किलोहून अधिक गांजा जप्त, दोघे अटकेत - नंदुरबार पोलीस बातमी

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडगाव-शहादा रस्त्यावर 61 किलो 135 ग्रॅम वजनाचा गांजा व जिप जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

जप्त मुद्देमालासह पोलीस पथक
जप्त मुद्देमालासह पोलीस पथक
author img

By

Published : Dec 24, 2020, 10:07 PM IST

नंदुरबार - जीपमधून सुका गांजाची वाहतूक होत असल्याने पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालक वेगात पुढे निघून गेला. पथकाने पाठलाग करत वाहन पकडल्याने त्यात 61 किलो 135 ग्रॅम वजनाच्या सुक्या गांजासह 9 लाख 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

एलसीबीने रचला सापडा

धडगांव येथून शहाद्याकडे चारचाकी वाहनातून सुका गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली. त्यांनी पथकास कारवाईच्या सूचना दिल्या असता रात्री 8.30 वाजेदरम्यान एलसीबीचे पथक शहादा तालुक्यातील दरा फाट्यावर सापळा रचून होते. यावेळी येणार्‍या वाहनांचे निरीक्षण करत असताना एका चारचाकी जीप गाडीवर पोलिसांना संशय आला. त्यांनी बॅटरीच्या सहायाने वाहन थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने भरधाव वेगात पुढे निघून गेला. पोलिसांनी पाठलाग करत शिताफीने गाडी पकडली. चालक व सहचालकास विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

61 किलो सुखा गांजा जप्त

पोलिसांनी दोघांना खाक्या दाखवत वाहनांची तपासणी केली असता 61 किलो 135 ग्रॅम वजनाचा गांजा ज्याची किंमत अंदाजे 4 लाख 27 हजार 925 रुपये किंमतीचा मिळून आला. पथकाने गांजासह वाहन, असा एकूण 9 लाख 27 हजार 945 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोप्या डेंमच्या पावरा (वय 25 वर्षे, रा.धडगाव प्रिंप्राणी), विनोद भगवान चव्हाण (रा.वडफळ्या) या दोघांविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 20, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा - अवैध वाळू माफियांवर कारवाई करा; प्रवासी संघटनेची मागणी

हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवा - अब्दुल सत्तार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.