ETV Bharat / state

नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची आवक तेजीत, दोन महिन्यात तीस हजार क्विंटल खरेदी

देशातील सर्वात मोठे लाल मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन महिन्यात तीस हजार क्विंटल लाल मिरची खरेदी करण्यात आली आहे.

nandurbar
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Dec 20, 2019, 10:30 AM IST

नंदुरबार - देशातील सर्वात मोठे लाल मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या बाजार समितीत आत्तापर्यंत ३० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी करण्यात आली आहे. तर, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सुरू होणारा लाल मिरचीचा हंगाम यावर्षी खराब हवामानामुळे २ महिने उशिरा सुरू झाला आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या ३ वर्षांपासून दीड लाख क्विंटलच्यावर मिरचीची आवक होत आहे. साधारणत: सप्टेंबर महिन्यापासून मिरची हंगामाला सुरुवात होते. तर, मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत लाल मिरची खरेदी-विक्री होत असते. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे मिरची हंगामाला एक महिना उशीर झाला आहे. तरीही आतापर्यंत ३० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सांगण्यात आले. मात्र, उत्पन्नात वाढ होऊ शकते असा देखील अंदाज त्यांनी वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदाचे भाव वाढतील किंवा कमी होतील अशी शक्यता देखील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा - शॉर्टसर्किटमुळे ट्रक जळून खाक; जीवितहानी नाही

नंदुरबार बाजार समितीमध्ये दररोज २ ते अडीच हजार क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून ही आवक ३ ते ४ हजार क्विंटल आवक होईल, असा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी वर्तवला आहे.

हेही वाचा - सारंगखेडा यात्रोत्सवात यंदा सहा लाखांचे सर्वात महाग अश्व

Intro:नंदुरबार - देशातील सर्वात मोठी लाल मिरचीचे बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ची ओळख आहे. बाजार समितीत आतापर्यंत तीस हजार क्विंटल लाल मिरचीची आता पर्यंत खरेदी करण्यात आले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सुरू होणारा लाल मिरचीचा हंगाम यावर्षी खराब हवामानामुळे दोन महिने उशिरा सुरू झाला आहे.
Body:नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत झुला तीन वर्षापासून दिड लाख क्विंटल च्या वर मिरचीची अवक होत असते. साधारण सप्टेंबर महिन्यापासून मिरची हंगामाला सुरुवात होते गणपती मार्च महिन्यापर्यंत लाल मिरची खरेदी-विक्री होत असते. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे मिरची हंगाम एक महिना उशीर झाल्याने आता पाहतो तीस हजार क्विंटल लाल मिरचीची विक्री झाल्याची कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सांगण्यात आले. मात्र उत्पन्नात वाढ देखील होऊ शकते असा देखील अंदाज त्यांनी वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदाचे भाव वाढतील किंवा कमी होतील अशी शक्यता देखील व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
नंदुरबार बाजार समितीमध्ये दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे. मात्र जानेवारी महिन्यापासून ही आवक तीन ते चार हजार क्विंटल आवक होईल असा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी वर्तविला आहे.

Byte - योगेश अमृतकर
सचिव- कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारConclusion:Byte - योगेश अमृतकर
सचिव- कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.