नंदुरबार - शहरातील दीनदयाल चौकातील जळगाव पीपल बँकेचे एटीएम फोडण्याचा रात्री चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. भरवस्तीत ही घटना घडत असताना सुरक्षारक्षक कुठे होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे शहरातील एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - ..जर हा गुन्हा असेल तर पुन्हा-पुन्हा आणि प्रत्येक जन्मात 'अशीच' शपथ घेईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एटीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक एटीएम कक्षाच्या बाहेर २४ तास तैनात असणे बंधनकारक आहे. असे असतानाही एटीएम सेंटरवरील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. शहरातील काही एटीएम सेंटरवरील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे या घटनेनंतर निदर्शनास आले. एटीएम फोडण्याचा या फसलेल्या प्रयत्नानंतर तरी बँक प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - तेलंगणा बलात्कार,खून प्रकरण; आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी