ETV Bharat / state

नंदुरबार शहरात दहा नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, बाधितांचा आकडा 60 वर - नंदुबार कोरोना न्यूज

नंदुरबार येथे दहा रविवारी (दि. 14 जून) रात्री उशीर प्राप्त झालेल्या अहवालानुसार 10 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा 60 वर पोहोचला आहे.

nandurbar
नंदुरबार
author img

By

Published : Jun 15, 2020, 2:23 PM IST

नंदुरबार - शहरातील दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील लक्ष्मी नगर भागातील दोन, जिल्हा रुग्णालयातील दोन तर रनाळे येथील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा तर जामा मशिद परिसरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 60 वर पोहोचली आहे. दरम्यान, जामा मशीद परिसरातील एकाच कुटुंबातील सर्व जण पॉझिटिव्ह आल्याने जेवणावळीला उपस्थित असणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. रविवारी (दि. 14 जून) रात्री उशिरा प्रशासनाला 20 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन जणांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. गडदाणी येथील बाधितांचा अहवाल चौथ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. तर गाझीनगर मधील महिलेचा शासकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नाशिक येथे खासगी रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नंदुबारमधील दृश्य

गांधीनगर येथील बाधिताच्या कुटुंबातील तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, प्राप्त अहवालात खानसामाचे सर्व कुटुंब बाधित आढळून आले आहे. त्यात 38, 24, 40, 22, 29 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील दोन व्यक्तींचा बाधितांमध्ये समावेश आहे. त्यात 58 वर्षीय महिला व 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील 31 वर्षीय पुरुष व 42 वर्षीय महिला कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. तर रनाळे येथील एका बाधित महिला रुग्णाच्या 38 वर्षीय पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी (दि. 14 जून) रात्री दहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 60 वर पोहोचली आहे. यापैकी 32 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर 23 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापूर्वीच तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये पावसाची जोरदार हजेरी ; 33 मी.मी.पावसाची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.