ETV Bharat / state

Stone Throwing Case : अक्कलकुवामध्ये आक्षेपार्ह स्टेटसवरुन वाहनांची तोडफोड; आरोपींच्या अटकेपर्यंत गाव राहणार बंद - अक्कलकुवा गाव बंद

आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर घरी परतत असतांना त्या गटातील काही समाजकंटकांनी अक्कलकुव्यातील तळोदा नाका, मुख्य बाजारपेठ, झेंडा चौक, शिक्षक कॉलनी या भागातून जातांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड ( Stone Throwing Akkalkuwa ) सुरु केली. तसेच घरांवर दगडफेक करत लाठ्या-काठ्या, पाईप घेवून वाहनांची तोडफोड करत नुकसान करण्यात आहे.

अक्कलकुवा दगडफेक
अक्कलकुवा दगडफेक
author img

By

Published : Jun 12, 2022, 8:30 PM IST

Updated : Jun 12, 2022, 8:44 PM IST

नंदुरबार - अक्कलकुवा येथे आक्षेपार्ह स्टेटसच्या वादातून मध्यरात्री जमावाकडून तुफान दगडफेक ( Stone Throwing Akkalkuwa ) करण्यात आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान करुन तोडफोड करण्यात आले. दरम्यान घटनेचे माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 48 संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहीती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली आहे. दरम्यान विशेष महा पोलीस निरीक्षक डी.जे. शेखर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. गाव पूर्णतः अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देताना आमदार पाडवी

दगडफेक व वाहनांची तोडफोड : आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर घरी परतत असतांना त्या गटातील काही समाजकंटकांनी अक्कलकुव्यातील तळोदा नाका, मुख्य बाजारपेठ, झेंडा चौक, शिक्षक कॉलनी या भागातून जातांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड सुरु केली. तसेच घरांवर दगडफेक करत लाठ्या-काठ्या, पाईप घेवून वाहनांची तोडफोड करत नुकसान करण्यात आहे. परिसरात काचेच्या बाटल्या व दगड, विटांचा खच पडलेला होता. यामुळे अक्कलकुव्यातील काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळी पोलीस दाखल : अक्कलकुवा पोलिसांनी वेळीच धाव घेत जमावाला पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील हे आपल्या ताफ्यासह तत्काळ अक्कलकुव्यात दाखल झाले. त्याचबरोबर धडगाव, विसरवाडी, मोलगी, सारंगखेडा, नंदुरबार येथून अतिरिक्त बंदोबस्त मागवून संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे घाबरलेल्या नागरीकांना दिलासा देवून याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींना तत्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. संवेदनशील भागात कडेकोट पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने तणावपूर्ण शांतता आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार केले असून कार्यवाहीसाठी रवाना केले आहे. अक्कलकुवा पोलिसांनी तालुक्यातील परिसर पिंजुन काढत 24 संशयित आरोपींना अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

शिवसेना संपर्क कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोड : आक्षेपार्ह पोस्टवरुन जमावाने दगडफेक करत अक्कलकुवा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचे फोडण्यात आली. कार्यालयातील वातानुकूलित यंत्रही दगडफेक करुन नुकसान करण्यात आले आहे. याबाबत शिवसेना शहरप्रमुख रावेंद्रसिंह चंदेल यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'अफवांवर विश्‍वास ठेवून नका' : दोन समाजात तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशा प्रकारचे सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवू नका. आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत किंवा ठेवतांना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही. त्याचबरोबर कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवून नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

आमदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी : अक्कलकुवा शहरात जमावाकडून झालेल्या नुकसानग्रस्त भागाची शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी पाहणी केली. त्याचबरोबर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याशी चर्चा देखील केली. सोबतच आमदार राजेश पाडवी यांनी ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांशी चर्चा केली.

घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थाच्या वतीने बेमुदत गांव बंद : 11 जून पासून अक्कलकुवा शहरात नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवत स्वयंस्फूर्तितीने कडकडीत बंद पाळला आहे. दरम्यान अक्कलकुवा पोलिसांनी घटनेच्या गुन्हा दाखल करून आरोपीची धरपकड सुरू केली आहे. मात्र इतर संशयित मुख्यआरोपींना अद्यापपर्यंत अटक केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून नागरिकांनी शहरात 11 जूनपासून सलग दुसऱ्या दिवशीही 12 जून रोजी ही कडकडीत बंद पाडला आहे.

हेही वाचा - Beed : पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याचा राग; चौसाळ्यात समर्थकांकडून दरेकरांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

Last Updated : Jun 12, 2022, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.