नंदुरबार - जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्रीच्या सुमारास साप आढळला. सापाला पाहून रुग्णालयातील कर्मचारी भयभीत झाले होत. काही वेळातच सर्पमित्राने साप पकडला असून त्याला नजीकच्या जंगलात सोडले.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रात्रीच्या सुमारास ऑपरेशन थिएटरमध्ये एक मोठा साप आढळला. याबाबची माहिती सर्पमित्राला देण्यात आली. माहिती मिळताच सर्प मित्राने ताबोडतोब रुग्णालय गाठून सापाला पकडले.
जिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार केला जातात. मंगळवारी रात्री एका गर्भवती महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर व नर्सना तिथे साप दिसला. त्यामुळे रुग्णालयात अचानक सर्वांची धावपळ उडाली. मात्र, त्वरित सर्पमित्राला पाचारण करून सापाला पडकण्यात आले. या सर्व धावपळीनंतर त्या महिलेची सुखरुप प्रसूती झाली.