ETV Bharat / state

काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करणे गरजेचे : शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी - शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार

धुळे-नंदुरबार विधानसभा पोटनिवडणुकीत सर्वाधिक 212 मते महाआघाडीकडे होती. तर 22 मते अपक्ष होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजय निश्चित होता, असेही ते म्हणाले. तर भाजपकडे एकूण 203 मते होती.

shivsena leader chandrakant raghuwanshi
शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी
author img

By

Published : Dec 3, 2020, 7:30 PM IST

नंदुरबार - विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीचे 115 मते फुटल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यात काँग्रेसचा एकही नेता प्रामाणिक नव्हता, असा आरोप करत काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. तसेच काँग्रेसची मते फुटल्याचा दावाही रघुवंशी यांनी केला.

शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी ईटीव्ही भारतसोबत बोलताना.

महाविकास आघाडीकडे होती सर्वाधिक मते -

धुळे-नंदुरबार विधानसभा पोटनिवडणुकीत सर्वाधिक 212 मते महाआघाडीकडे होती. तर 22 मते अपक्षांकडे होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजय निश्चित होता, असेही ते म्हणाले. तर भाजपकडे एकूण 203 मते होती. भाजपने अपक्ष 22 मतांवर आपला दावा असल्याचे सांगितले होते. त्यावरून अमरीश पटेल विजय होतील, असा दावा व्यक्त केला होता.

हेही वाचा - विधानपरिषद रणधुमाळी : धुळ्यातून भाजपचे अमरिश पटेल विजयी; पाहा LIVE अपडेट्स..

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव -

धुळे नंदुरबार विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार अभिजीत पाटील यांना आवघी 98 मते पडली आहे. त्यामुळे त्यांचा दारुण पराभव झाला. तर भाजप उमेदवाराला अमरिश पटेल यांना 332 मते मिळाली.

काँग्रेस पक्षाला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला -

धुळे नंदुरबार विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक काँग्रेस पक्षाकडे मते होती. अपेक्षेपेक्षा कमी मते काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांना मिळाली. यावर काँग्रेस नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला सेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला आहे. तसेच ज्याठिकाणी सेना सत्तेत होती त्याठिकाणी महाआघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाल्याचा दावाही रघुवंशी यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.