नंदुरबार - उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात आज निच्चांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील दाब आणि वालंबा गावात अचानक तापमान घटल्यामुळे थोड्या प्रमाणात हिमकण कोसळल्याची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यात निच्चांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
नंदुरबार जिल्ह्यात ७ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आल्याने जिल्ह्यात थंडीची लाट ( cold wave in the Nandurbar district ) पसरली आहे. दरम्यान, तापमानाने निच्चांक गाठल्याने अक्कलकुवा तालुक्यातील डाब आणि वालंबा परिसरात दवबिंदू गोठले आहे. घराच्या छतांवर, शेतातील पिकांवर, वाहनांवर पहाटेच्या वेळी बर्फाचा सडा पडलेला दिसत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाब आणि वालंबा गावात अचानक तापमान ( lowest temperature in Akkalkuwa taluka ) घटले. त्यामुळे थोड्या प्रमाणात हिमकण झाल्याची नोंद ( hairlstrom in Nandurbar ) करण्यात आली आहेत. तसेच दबबिंदू गोठले आहेत. डाब आणि वालंबा परिसर हे थंड हवेचे ठिकाण आहे. याठिकाणी दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात तापमान निच्चांक गाठत असते. थंडगार वातावरणाबरोबरच मनमोहक असे निसर्गरम्य वातावरणदेखील ( beautiful natural environment due to low temp ) या भागात सध्या पहायला मिळात आहे.
कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
- शेतकरी बांधवांनी थंडीची लाटेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांना हलके पाणी द्यावे.
- जेणेकरून शेताचे तापमान नियंत्रित राहील व पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल.
- शक्य असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
- साधारणपणे केळी व पपई या फळबागांच्या पिकासाठी कडाक्याच्या थंडीचा विपरीत परिणाम होऊन, नुकसान होण्याची शक्यता असते.
- केळी पपईच्या फळांना संरक्षणासाठी प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे.
- बागेच्या भोवती सजीव कुंपण लावून, थंड वार्यापासून बागेचे संरक्षण करावे.
- बागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटेच्या वेळी पाणी द्यावे ज्यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते.
- झाडांच्या आळ्यात व खड्ड्यात जवळ वाळलेला पालापाचोळा टाकावा. उसाचे पाचट किंवा गव्हाचा भुसा यांचा उपयोग करावा. त्यामुळे थंड तापमानाचा झाडाच्या मुळावर परिणाम होत नाही.
- अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी हिमवृष्टीपासून पिकांना वाचविण्यासाठी पिके प्लॅस्टिकच्या चादरींनी झाकून ठेवावीत.
- असे केल्याने प्लॅस्टिकच्या आतील तापमान वाढते, त्यामुळे तापमान गोठणबिंदूपर्यंत पोहोचत नाही पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होते.
- थंड वाऱ्यापासून जनावरांचे, कोंबड्यांचे संरक्षण करावे. शेडमध्ये तापमान वाढवण्यासाठी बल्ब लावावेत आणि शेडला पडदे लावावेत.
- जनावरांना उर्जा व प्रथिनेयुक्त पशु आहाराचा समावेश करून आहार वाढवावा असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस थंडीची तीव्रता कायम राहणार असून हवामान कोरडे राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे, अशी माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील पुढील तीन ते चार दिवस थंडीची तीव्रता असणार आहे. हवामान कोरडे राहील, असा अंदाज कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी व्यक्त केला आहे.