नंदुरबार - सेना-भाजपनेच राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या मागणीसाठी नंदुरबारमध्ये शिवसैनिकाने थेट टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. आंदोलन सुरू केले आहे. सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची अभद्र युती करू नये, अशी या शिवसैनिकाची मागणी आहे. तसेच याबाबत सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जोपर्यंत संवाद होणार नाही, तोपर्यंत टॉवरवरुन उतरणार नसल्याची भूमिका या कार्यकर्त्याने जाहीर केली आहे.
तुकाराम पाटील असे या शिवसैनिकाचे नाव असून, तो कार्ली गावचा रहिवासी आहे. संबंधित कार्यकर्ता जवळपास 11 वाजल्यापासून मोबाईल टॉवरवर चढला असून, अद्याप त्याच ठिकाणी आहे.
टॉवरच्या प्रवेशद्वारावर त्याने चिठ्ठी लिहून स्वत:च्या भावना व्यक्त केल्या आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, या व्यक्तीची समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, अद्याप तो आपल्या मागणीवर ठाम असल्याने पोलिसांची तारांबळ झाली आहे.