ETV Bharat / state

साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली सारंगखेडा येथील यात्रा कोरोनामुळे रद्द

कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली सारंगखेडा येथील एक मुखी दत्ता यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय जिल्हा प्रशासन व दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे.

author img

By

Published : Dec 24, 2020, 11:18 AM IST

sarangkheda datta yatra cancelled due to corona pandemic
साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली सारंगखेडा येथील यात्रा कोरोनामुळे रद्द

नंदुरबार - सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली सारंगखेडा येथील एक मुखी दत्ता यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे. दरम्यान, देशभरातून भाविक गुरु दत्ताच्या दर्शनासाठी येथे येत असतात. तसेच देशातील दोन नंबरचा घोडेबाजार येथे भरत असतो. यात करोडोंची उलाढाल होत असते.

जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना

कोरोना संसर्गाच्या पार्श्ववभूमीवर यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही. दत्त जयंतीला दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करून आवश्यक व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

पालखी सोहळ्यात मर्यादित भाविकांची उपस्थिती
दत्त जयंती निमित्त पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मर्यादीत राहील आणि शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. मंदिरात पारंपरिक विधी आणि भाविकांचे दर्शन सुरू राहील. मंदिर परिसरात केवळ 50 व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा. इतर भाविकांना टप्प्याटप्प्याने तेथे आणण्याची व्यवस्था करावी. भाविकांनां योग्य रांगेत उभे रहाण्यासाठी खूणा करण्यात याव्यात. रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. दत्त जयंतीच्या दिवशी गरजेनुसार स्थानिक प्रशासनाने एक किंवा दोन तास वेळेत वाढ करावी, अशा सुचना जिल्हा प्रशासनाकडून मंदिर समितीला देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागातील पथक तैनात
आरोग्य विभागाने दत्त मंदिर परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करावे आणि थर्मल स्कॅनरची व्यवस्था करावी. ग्रामपंचायतीने दोन ठिकाणी साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी. फुले आणि नारळाच्या दुकानांची संख्या मर्यादीत ठेवावी व अशा दुकानांची माहिती पोलिसांना द्यावी, असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

आचारसंहितेचे पालन करावे - जिल्हाधिकारी
निवडणूक आचारसंहितेचे सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी यावेळी दिले आहेत.

गर्दी वाढल्यास स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी - जिल्हा पोलीस अधीक्षक
भाविकांची गर्दी वाढल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था करावी. मंदिर परिसरात त्यांना ठरावीक अंतराने सोडावे. परिसरात नियंत्रण कक्ष स्थापित करून त्यात सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकार्‍यांनी उपस्थित रहावे. मास्कशिवाय भाविकांना मंदिरात प्रवेश देऊ नये, असे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सांगितले. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी आणि मंदिर समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सारंगखेडा यात्रे निमित्ताने वाहतूक मार्गात बदल
नंदुरबार जिल्ह्यात दि. 29 डिसेंबर ते दि. 12 जानेवारी 2021 या कालावधीत दत्त जयंती निमित्त सारंगखेडामार्गे होणाऱ्या वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. दत्त जयंती उत्सवा दरम्यान 28 डिसेंबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपासून ते 13 जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावरील शहादा, सारंगखेडा, दोंडाईचाकडे जाणारे जड वाहनांना ( ट्रेलर, चारचाकरी वाहनांची वाहतूक करणारी वाहने, कारखान्याची मशिनरी वाहतूक करणारी वाहने ) सारंगखेडा रोडमार्गे घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

गुजरात राज्यातून अक्कलकुवा- तळोदा-शहादा-सारंगखेडा मार्गे सोनगीर-धुळेकडे जाणारी अवजड वाहने ही शहादा-अनरद बारी - वडाळी-शिरपूर मार्गे सोनगीर-धुळेकडे जातील किंवा तळोदा- प्रकाशा-नंदुरबार-दोंडाईचा मार्गे सोनगीर-धुळेकडे जातील.

धुळेकडून सोनगीर फाटा-दोंडाईचा-सारंगखेडा मार्गे शहादाकडे येणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुली-नंदुरबार-प्रकाशामार्गे शहादाकडे जातील किंवा सोनगीर फाटा-शिरपूर-वडाळी- अनरदबारी मार्गे शहादाकडे जातील, असे प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी सांगितलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.