ETV Bharat / state

नवापूर शहरात चिकन, अंडी विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी - नवापूर बर्ड फ्लू न्यूज

नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फॉर्ममध्ये हजारो कोंबड्यांचा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाला आहे. मृत कोंबड्यांची माहिती लपविणार्‍या एका पोल्ट्री व्यावसायिकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तीन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवापूर शहरात चिकन, अंडी विक्रीवर बंदी
नवापूर शहरात चिकन, अंडी विक्रीवर बंदी
author img

By

Published : Feb 6, 2021, 12:39 PM IST

Updated : Feb 6, 2021, 12:57 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील नवापूर शहरात चिकन व अंडी विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी पोल्ट्री फॉर्मची पाहणी करुन नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्री फॉर्म सील करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले आहेत.

नवापूर शहरात चिकन, अंडी विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

तीन दिवसात सात हजार कोंबड्यांचा मृत्यू
नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फॉर्ममध्ये हजारो कोंबड्यांचा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाला आहे. मृत कोंबड्यांची माहिती लपविणार्‍या एका पोल्ट्री व्यावसायिकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तीन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील तीन दिवसात सात हजार कोंबड्यांचा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाला आहे. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू की इतर कोणत्या आजारामुळे झाला आहे हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

अधिकाऱ्यांकडून पोल्ट्री फार्मची पाहणी

नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने विविध अफवांना ऊत येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रांताधिकारी वसुमना पंथ, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरिक्षक बाळासाहेब भापकर यांनी प्रशासनाने सील केलेल्या पोल्ट्री फार्मची पहाणी केली.

नवापूर शहरात चिकन, अंडी विक्रीवर बंदी
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत नवापूर शहरात चिकन व अंडी विक्रीला बंदी घालण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २२ पोल्ट्री सील करण्याचे आदेश तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिल्या. पालिकेचे आरोग्य निरिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी नवापूर शहरातील चिकन व अंडी विक्रीवर बंदी घालण्यात येत असल्याचे सांगितले. दरम्यान बर्ड फ्लू नसतानाही चिकन, अंडी विक्रीवर बंदी का? असा प्रश्न उपस्थित करत पोल्ट्री फार्म व्यवसायिकांनी नवापूर पोलीस स्थानकात गर्दी केली होती.

Last Updated : Feb 6, 2021, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.