नंदुरबार - गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, या कामासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे रीतसर दुर्लक्ष केले जात आहे. सुसरी धरणाच्या जवळ सुरु असलेल्या वळण रस्त्याच्या कामाचा भराव पहिल्या पावसात खचल्याने कामाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिल्या पावसात रस्त्याचा भराव खचल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शहादा तालुक्यातील कोळदा ते खेतिया रस्ताचे गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र, हे काम काम आहे तेवढ्याच स्वरूपात गेल्या दोन वर्षांपासून दिसत आहेत. या कामात कोणत्याही प्रकारचा वेग नाही. दिवसेंदिवस रस्त्यावरील खड्डे वाढत आहेत. मात्र, यंदा या रस्त्यावर नवीन समस्या निर्माण झाली आहे. पहिल्या पावसातच रस्त्याचा भराव खचल्याने रस्त्याला मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे स्पष्ट होत असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परिसरातील शेतकऱ्यांनी व वाहन चालकांनी तक्रार केली आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची कदाचित सार्वजनिक बांधकाम विभाग वाट पाहत आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर रस्त्याचे काम लवकर करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक, शेतकरी व वाहनचालकांनी केली आहे.