ETV Bharat / state

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून समता परिषदेतर्फे जिल्ह्यात रास्ता रोको

author img

By

Published : Jun 17, 2021, 7:17 PM IST

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटना यांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नंदुरबार येथील धुळे चौफुली व शहाद्यातील दोंडाईचा शहादा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून चक्काजाम करत घोषणाबाजी करण्यात आली.

Samata Parishad Road block Nandurbar
ओबीसी आरक्षण समता परिषद रास्ता रोको

नंदुरबार - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटना यांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नंदुरबार येथील धुळे चौफुली व शहाद्यातील दोंडाईचा शहादा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून चक्काजाम करत घोषणाबाजी करण्यात आली.

माहिती देताना समता परिषदचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ

आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी संघटनांकडून एल्गार

ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी शहादा व नंदुरबार येथे रास्ता रोको आंदोलन करून एल्गार पुकारण्यात आला. ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी, तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या आदेशानुसार जिल्हातील ओबीसी संघटना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ओबीसी संघटना उतरल्या रस्त्यावर

या आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांसह सर्व ओबीसी संघटना पदाधिकारी कार्यकर्ते परिषदेच्या पदाधिकारी कार्यकत्यांनी एकत्र यावेत व सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन समता परिषदचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी केले.

हेही वाचा - अपूर्ण बिले भरल्याने महावितरणने शेतकऱ्यांना धरले वेठीस.. संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, जिल्हा सरचिटणीस रामाशंकर माळी, उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील, शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी, ईश्वर वारुळे, राष्ट्रवादीचे जिल्ह्या उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, मधुकर माळी, रोहन माळी, मनोज माळी, वासुदेव माळी आदी समता सैनिक व ओबीसी समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.