ETV Bharat / state

शहादा मतदारसंघातून राजेंद्रकुमार गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत - राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित

शहादा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे, मतदारसंघ राष्ट्रावादीला न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत.

राजेंद्रकुमार गावित
author img

By

Published : Oct 3, 2019, 8:02 AM IST

नंदुरबार - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांचा शहादा हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यापासून ते मुंबईत तळ ठोकून होते. बुधवारी मुंबईहून परत आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढची दिशा ठरवणार असल्याचे सांगितले आहे, यामुळे राजेंद्र गावित हे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

शहादा मतदारसंघातून राजेंद्रकुमार गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत

हेही वाचा... दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?

शहादा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापण्यास सुरुवात झाली आहे. राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची गर्दी होत होती. यावेळी बोलताना गावित यांनी, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.

हेही वाचा... 'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..'

राजेंद्र गावित हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. राजेंद्र गावित यांचा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. यामुळे गावित हे आता राष्ट्रवादीशी बंडोखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार की, मनसेची उमेदवारी स्वीकारतात हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

Intro:नंदुरबार :- शहादा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस राजकीय वातावरण टाकण्यास सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यापासून मुंबईत तळ ठोकून होते. आज ते मुंबईत परत आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवावी असा आग्रह त्यांच्याकडे धरला आहे.Body:
राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे गर्दी होती कार्यकर्त्यांचा भावनांचा आदर राखत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं राजेंद्र गावित यांनी सांगितले राजेंद्र गावित हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात न व्यक्त केली जात आहे. राजेंद्र गावित यांचा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. राजेंद्र गावित अपक्ष निवडणूक लढवता की मनसेच्या तिकीट घेतात हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र आपण कार्यकर्त्यांचा भावनांचा आदर राखून निर्णय घेऊ असं राजेंद्र गावित यांनी सांगितले.

Byte:-राजेंद्र गावित राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षConclusion:
Byte:-राजेंद्र गावित राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.