ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये तब्बल १५ दिवसांनी पावसाचे आगमन; तरीही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार

दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी असले तरी पुन्हा पाऊस कधी येईल आणि पिकांची वाढ कशी होणार याची चिंता त्यांना लागली आहे. आठ-दहा महिन्यापासून कोरड्या पडलेल्या नद्या अजून कोरड्याच आहेत. त्यामुळे अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे.

जिल्ह्यातील पिके
author img

By

Published : Jul 22, 2019, 6:10 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट काहीअंशी टळले आहे.

नंदुरबार मधील पिकांना पावसाचा दिलासा

खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाचा मोठा खंड पडत गेला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यात अजूनही 30 टक्के पेरण्या बाकी आहेत. पेरणी केलेल्या पिकांची कमी पर्जन्यामुळे कमी वाढ झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, तूर, भात, ज्वारी या पारंपारिक पिकांची पेरणी केली आहे. मात्र, कमी पावसामुळे या पिकांची वाढ पाहिजे तशी झालेली नाही. रविवारी झालेल्या या पावसाने पिकांना आधार मिळाला असला तरी यापुढे कधी पाऊस येईल आणि पिकांची वाढ कशी होईल आणि उत्पन्न कसे निघेल याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

यावर्षीच्या हंगामात पहिल्यांदा विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह झालेल्या पावसाची प्रथमच अतिवृष्टीत नोंद झाली आहे. गेल्या 48 तासात जिल्ह्यात २५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी नवापूर तालुक्यात ७० नंदुरबार ६१ शहादा २८ तळोदा ३९ अक्कलकुवा ४७ तर धडगाव ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Intro:जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटे पर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे आगमन केल या पावसामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे आणि दुबार पेरणीचे संकट काही अंशी टळलं आहे.

परंतु यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांपुढे कायमचा प्रश्न पडत जात आहे तो यापुढे कधी पाऊस येईल? आणि पुढे काय होणार?

Body:यंदा खरीप हंगामासाठी सुरुवातीपासूनच पावसाचा मोठा खंड पडत गेला आहे त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यात अजूनही 30 टक्के पेरण्या बाकी आहेत आणि पेरणी केलेल्या पिकांची कमी पर्जन्यामुळे कमी वाढ झाली आहे त्यामुळे त्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे.

कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, तुर, भात, ज्वारी या पारंपारिक पिकांसह जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे परंतु कमी पावसामुळे या पिकांची वाढ पाहिजे तशी झालेली नाही तब्बल पंधरा दिवसांच्या खंडानंतर रविवारी झालेल्या या पावसाने पिकांना आधार मिळाला आहे परंतु यापुढे कधी पाऊस येईल आणि पिकांची वाढ कधी होईल आणि उत्पन्न कसं निघेल याची चिंता शेतकऱ्यांना कायम आहे.

Conclusion:यंदाच्या हंगामात प्रथमच विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह झालेल्या पावसाची प्रथमच अतिवृष्टीत नोंद झाली आहे. गेल्या 48 तासात जिल्ह्यात २५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे यापैकी नवापूर तालुक्यात ७० नंदुरबार ६१ शहादा २८ तळोदा ३९ अक्कलकुवा ४७ तर धडगाव ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला परंतु गेल्या आठ-दहा महिन्यापासून कोरड्या पडलेल्या नद्या कोरड्याच आहे त्यामुळे अजूनही पिण्यासाठी आणि शेतीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा बळीराजाला कायम आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.