नंदुरबार - भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहादा येथे भाजपा संस्कृती आघाडीतर्फे जिल्ह्यातील सुपुत्र निलेश माळी हा मणिपूर येथे शहीद झाला होता. त्याचा सजीव देखावा सादर करून शहीद जवानाला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सजीव देखावा पाहत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले व एकच सूर निघाला निलेश माळी अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
जिल्ह्यातील सुपुत्राला स्वातंत्र्यदिनी आदरांजली -
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडीतर्फे 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मणिपूर येथे शहीद जवान निलेश माळी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी शहीद निलेश माळी यांना आदरांजली वाहिली. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनी शहीद जवानाचा सजीव देखावा सादर शहीदांचा सजीव देखावा सादर -देशाच्या सीमेवर सुरक्षा कवच देणाऱ्या जवानांच्या जीवनावर सांस्कृतिक देखावा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहादा शहरातील मुख्य चौकात शहीद जवान निलेश माळी यांच्या स्मृतीस नमन करून प्रभात फेरी काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणले. विशेष म्हणजे शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करून कायमस्वरूपी उजाळा मिळावा, त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने शहीद जवानांच्या परिवारावर आलेली परिस्थितीचा हुबेहूब जीवन पट भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडीतर्फे सादर करण्यात आला. जवानांचे बलिदान चिरकाल स्मरणात ठेवून लोकांना जवानांच्या कार्याची प्रेरणा मिळावी. या शुद्ध हेतूने जवानांबद्दल देशप्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी कलाकारांनी हा कार्यक्रम घडवून आणला.