ETV Bharat / state

Accused Arrest : लॉकअप तोडून फरार झालेल्या आरोपींपैकी एकास पकडण्यात पोलिसांना यश

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नर्सरी परिसरात लपलेल्या फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश (Accused Arrest) आले आहे . पोलिसांच्या वतीने सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक घटनास्थळावर उपस्थित असून लवकरच अजून फरार (Accused absconded from police custody) असलेल्या काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश येईल असे त्यांनी सांगितले. एका उसाच्या शेतात लपलेल्या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश (police succeeded in catching accused) आले आहे. Latest news from Nandurbar, Nandurbar Crime

Accused Arrest
आरोपींपैकी एकास पकडण्यात पोलिसांना यश
author img

By

Published : Dec 5, 2022, 7:03 PM IST

नंदुरबार : नवापूर पोलिसांनी काल रात्री दरोडाच्या तयारीत असलेल्या पाच संशयित आरोपींना अटक (Accused Arrest) केली होती. चपाती आरोपींना नवापूर पोलिसांनी लॉकऑपमध्ये टाकले होते. या पाच आरोपींनी नवापूर पोलीस स्टेशनच्या लॉकअप खिडकीचे गज कापून फरार (Accused absconded from police custody) झाले होते. हे आरोपी लॉकअप तोडून फरार झाल्यानंतर शेतामध्ये लपल्याचे काही प्रत्यक्ष दर्शनी सांगितल्यानंतर नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. यात पोलिसांना एक आरोपी पकडण्यात यश (police succeeded in catching accused) आले आहे. उर्वरित फरार आरोपींचे छायाचित्र (Latest news from Nandurbar) पोलिसांनी सोशल मीडियावर (Nandurbar Crime) प्रसारित केले आहेत.

पोलिसांचे सर्चिंग ऑपरेशन सुरू : नवापूर नर्सरी परिसरात लपलेल्या फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे . पोलिसांच्या वतीने सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक घटनास्थळावर उपस्थित असून लवकरच अजून फरार असलेल्या काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश येईल असे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिक आणि पोलीस एकमेकांच्या मदतीने फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. यात एका उसाच्या शेतात लपलेल्या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी दरोडा टाकण्याच्या होते बेतात : नवापूर शहर रेल्वे गेट जवळ काल रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील स्कार्पिओ गाडीत दरोडा साठी लागणारे हत्यार सापडले. संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेले पाचही आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे पोलीस प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे.

आरोपींची नावे :
1. हैदर ऊर्फ इस्राईल ईस्माईल पठाण, वय 20 वर्षे, राहणार कुंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
2. इरफान ईब्राहीम पठाण, वय 35 वर्षे, राहणार ब्राम्हनी - गराडा, ता. कन्नड,
3. युसुफ असिफ पठाण, वय 22 वर्षे, राहणार ब्राम्हनी गराडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
4. गौसखों हानिफखॉ पठाण, वय 34 वर्षे, राहणार ब्राम्हनी- गराडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
5. अकिलखों ईस्माईलखॉ पठाण, वय 22 वर्षे, राहणार कठोरा बजार, ता. भोकरदन, जि. जालना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.