नंदुरबार - पंतप्रधान मोदींनी संध्याकाळी ५ वाजता सफाई कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळी वाजून आणि थाळीनाद करून आभार व्यक्त करण्यास सांगितले होते. त्याला नंदुरबार शहरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून पोलीस कर्मचारी गस्तीसाठी बाहेर निघाले असताना नागरिकांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात आणि शंखनाद करत पोलीस कर्मचार्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अनेक जण कार्य करत आहेत. त्यामुळे येत्या 22 मार्चला रविवारी आपल्या घरासमोर उभे राहून टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन मोदींनी केले होते. त्यांचा या आवाहनाला प्रतिसाद देत या अतिगंभीर महामारीविरुद्ध लढणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालय स्टाफ, सफाई कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णवाहिका सेवा, औषधी दुकानदार, जीवनावश्यक वस्तू विकणारे दुकानदार, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, रेल्वे विभाग, एसटी महामंडळ, अन्न पुरवणाऱ्या सामाजिक संस्था आणि सेवाभावी संस्था यांच्या कार्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. तसेच या महामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेवून त्याच्या अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय, कर्मचारी, आरोग्य विभाग या संकटसमयी सर्व देशवासीयांचे रक्षणांसाठी स्वत:च्या जीवाची चिंता न करता वैद्यकीय मानवसेवा देणाऱ्या आरोग्य रक्षकांना पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी शंखनाद, घंटानाद व टाळ्या वाजून आभार व्यक्त केले.
हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद; सर्व बसफेऱ्या रद्द, रेल्वे स्थानकावर शुकशुकाट
हेही वाचा - 'जनता कर्फ्यू'ला नंदुरबारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; पाहा ड्रोनद्वारे टीपलेले शहराचे दृश्य