ETV Bharat / state

व्यापाऱ्यांच्या मुजोरीमुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात - व्यापाऱ्यांकडून कमी किमतीत पपई खरेदी

नंदुरबारमध्ये दिल्लीतील व्यापारी मोठ्या प्रमाणात पपई खरेदीसाठी येत असतात. मात्र यावर्षी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दर कमी दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Papaya growers farmers
पपई उत्पादक शेतकरी
author img

By

Published : Dec 23, 2019, 9:32 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र दरवर्षी पपईचे फळ तयार झाल्यावर खरेदीदार व्यापारी आणि शेतकरी यांच्यातला संघर्ष पाहायला मिळतो. नंदुरबारमध्ये दिल्लीतील व्यापारी मोठ्या प्रमाणात पपई खरेदीसाठी येत असतात. मात्र यावर्षी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दर कमी दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पपई उत्पादक शेतकरी मनोज माळी यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'सीएए व एनआरसीवरुन शहरी नक्षलवादी पसरवत आहेत अफवा'

यावर्षी व्यापाऱ्यांकडून 10 ते 12 रुपये प्रति किलोने पपईची खरेदी केली जात आहे. तर शेतकऱ्यांनी 18 रुपये प्रति किलोच्या दराची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांची मनमानी अशीच सुरू राहिली तर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. नंदुरबार जिल्ह्यातला पपई दराचा तिढा वाढण्याची शक्यता यातून निर्माण झाली आहे.

हेही वाचा... पीएमसी बँक घोटाळा : अध्यक्ष वरियंम सिंग यांच्या घराबाहेर आंदोलन

नंदुरबार जिल्ह्यात जवळपास नऊ हजार एकर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. पपईचे पीक शेतकऱ्यांसाठी मोठ्या जोखमीचे पीक म्हटले जाते. शेतकऱ्यांनी पपई तयार झाल्यावर व्यापाऱ्यांकडून पपईची खरेदी केली जाते. किरकोळ बाजारपेठेत पपई 60 रुपये किलोने विकली जाते आहे. व्यापारी मात्र शेतकऱ्यांकडून रुपये 10 ते 12 किलोने पपई खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांनी कमीत कमी 18 ते 20 रुपये प्रति किलो दराने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा... प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिग बी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला राहणार अनुपस्थित

Intro:नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र दरवर्षी पपईचे फळ तयार झाल्यावर खरेदीदार व्यापारी आणि शेतकरी यांच्यातला संघर्ष पाहण्यास मिळतो. व्यापाऱ्यांकडून 10 ते 12 रुपये प्रति किलोने पपईची खरेदी केली जात आहे. तर शेतकऱ्यांनी 18 रुपये प्रति किलोच्या दराची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांची मनमानी अशीच सुरू राहिली तर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. नंदुरबार जिल्ह्यातला पपई दराचा तीचा वाढण्याची शक्यता यातून निर्माण झाली आहे.Body:नंदुरबार जिल्ह्यात जवळपास नऊ हजार एकर क्षेत्रा पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड केले गेलेले आहे व पपईचे पीक शेतकऱ्यांसाठी मोठ्या जोखमीच पीक म्हटले जाते. शेतकऱ्यांनी पपईचे पीक तयार झाल्यावर व्यापाऱ्यांकडून पपईची खरेदी केली जाते. नंदुरबार जिल्ह्यात दिल्लीतील व्यापारी मोठ्या प्रमाणात पपई खरेदीसाठी येत असतात. मात्र यावर्षी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दर कमी दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. किरकोळ बाजारपेठेत पपई 60 रुपये किलोने विकली जाते आहे. तर व्यापारी शेतकऱ्यांकडून रुपये 10 ते 12 किलोने पपई खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांनी कमीत कमी 18 ते 20 रुपये प्रति किलो दराने करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांकडून पपईचे दर असेच कमी गेले तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पपई दराच्या मुद्यावर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येते.

Byte - मनोज माळी
पपई उत्पादक शेतकरीConclusion:Byte - मनोज माळी
पपई उत्पादक शेतकरी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.