नंदुरबार - दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून दोन दिवसात 206 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अखेर जिल्ह्यातील बाधितांनी 3 हजारांचा आकडा पार केला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 76 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या बाधितांची संख्या 3 हजार 45 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दोन दिवसात आलेल्या अहवालात 206 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.
शहरातील सविस्तर आकडेवारी
नंदुरबार शहरातील संतोषी माता नगरात 1 व्यक्ती, विरलविहारात 1, राजसिटीत 5, विमल हौसिंग सोसायटीत 3, मोहनीराज नगरात 2, नेहरूनगरात 2, परदेशीपुरात 1, रघुवंशी कॉम्प्लेक्स मागे 1, खंडेराव पार्कमध्ये 3, दत्त कॉलनीत 3, विद्या कॉलनीत 1, पैलवान नगरात 1, कोकणीहिल 2, रेल्वेकॉलनीत 1, रायसिंगपुरात 1, धर्मराज नगरात 1, श्रीकृष्ण स्नेह नगरात 1, एकता नगरात 1, चौधरी गल्लीत 2, वाघोदा रोड 1, पोलीस ठाण्यात 1, नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे 1, खामगांव येथे 3, भोणे येथे 1, अमळथे येथे 2, वैंदाणे येथे 4, खोंडामळीत 1, होळतर्फे रनाळ्यात 3, गुजरभवालीत 1, खोक्राळेत 1, अक्राळेत 2, रनाळे येथे 1, काकर्देत 1, आराळ्यात 2, विखरणला 1, शिंदे येथे 2, शहादा शहरातील वृंदावन नगरात 6, शंकर कॉलनीत 1, शंकर विहारात 2, सोनार गल्लीत 2, महालक्ष्मी नगरात 1, गणेश नगरात 2, संभाजी नगरात 1, द्वारकाधिश नगरात 1, मानसविहारात 3, शिरुड चौफुली परिसरात 4 शहाद्यात 2, शहादा कोर्टात 4, शहादा सीसीसी मध्ये 1,
शहादा तालुक्यातील जुनवणे येथे 3, ब्राम्हणपुरीत 4, प्रकाशातील भोईगल्लीत 1, डोंगरगांव येथे 4, लोणखेड्यातील जुनारोड भागात 1, कलसाडीत 2, अनरदला 1, लोणखेड्यात 6, मोहिद्यात 7, खैरवे-वडाळीत 1, न्यु.बामखेड्यात 1, असलोदला 4, पाडळद्यात 2, मलोणीत 3, सोनवदला 2, करणखेड्यात 2, दुरखेड्यात 1, तोरखेड्यात 1, तळोदा शहरातील मोठा माळीवाड्यात 1, श्रेयस कॉलनीत 1, बँक ऑफ बडोदा 3, खान्देशगल्लीत 1, प्रतापनगरात 1, तळोदा तालुक्यातील बोरद येथे 1, तर्हावदला 2, नवापूर शहरातील पोलीस ठाण्यात 1, महादेव गल्लीत 1, शास्त्रीनगरात 14, आदर्श नगरात 1, जुने पोस्ट ऑफीस 1, लालबारीत 3, जुनी महादेव गल्लीत 6, महाराणा प्रताप चौकात 1, फुलफळीत 7, जय महादेव मंदिर परिसरात 1, नवापूर तालुक्यातील चोरविहीर येथे 1, चिंचपाड्यात 1, बालाहाटला 1, देवलफळीत 2, खांडबारा येथील चौधरी गल्लीत 1, धडगांव येथे 1, धडगांव क्वॉरंटाइन सेंटरमध्ये 1, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे 3, साक्री येथील आदर्श नगरात 3, निजामपुरात 1, छडवेल येथे 1, धाडणे येथे 1, शिरपुर तालुक्यातील अंतुर्ली येथे 2, शिंदखेडा तालुक्यातील मालपुरात 1, धांदरणे येथे 1 असे 206 पॉझिटीव्ह रुग्ण दोन दिवसात आढळले आहेत.
दरम्यान, मंगळवारी 36 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने संसर्गमुक्त झाले आहेत. उपचार पूर्ण केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.