नंदुरबार - शहरातील विद्यालयात सामूहिक सूर्यनमस्कार घालत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सुमारे 14 वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवली आहे. यासाठी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून सूर्यनमस्कार घालून घेण्याची शास्त्रोक्त पद्धत शिकवली जाते. वर्षाच्या पहिल्या दिवशी सामूहिक सूर्यनमस्कार घालून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. सुमारे 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभाग घेतला.
300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र नवीन वर्ष आरोग्यदायी जावे, म्हणून नंदुरबार शहरातील श्रीमती एच.जे. श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालत नवीन वर्षाचे स्वागत केले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील श्रीमती एच जे श्रॉफ विद्यालयात जवळपास 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्य नमस्कार करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. एकाच वेळी विद्यार्थ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शिस्तीत सूर्य नमस्कार केलेत. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करून नवीन वर्ष स्वागत करण्याचा हा उपक्रम कायम ठेवला आहे. 2022 हे वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी हा संकल्प शाळेच्या वतीने करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितीत असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सूर्य पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आणि पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम आणि सूर्य नमस्कार यांचे महत्व सांगितले या आनोख्या उपक्रमांचे कौतुक होत आहे.
14 वर्षांपासून अखंडित परंपरा कायम -
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अतिशय निवडक विद्यार्थीं आणि शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या सामुहीक सुर्यनमस्कार कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पहवायास मिळाला. जवळपास १४ वर्षांपासुन श्रॉफ शाळा हा उपक्रम राबवत आहे. यावेळी उपस्थित क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी या सुर्यनमस्कार उपक्रमाचे कौतुक केले तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी असा उपक्रम सर्वच शाळांना अनिवार्य करण्याची गरज देखील व्यक्त केली.