नंदुरबार - जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर पहिली ते सातवीच्या शाळेतील विद्यार्थी परतले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शहरामध्ये बहुतांश शाळांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक तर ग्रामीण भागात 90 टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे (Nandurbar ZP CEO Raghunath Gawde ) यांनी सांगितले. राज्य सरकारने आजपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या काळातील नियमावली आणि पालकांच्या सहमतीने विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत. जिल्ह्यातील 1736 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 29 हजार 635 विद्यार्थी आजपासून शाळेची वाट धरणार आहेत. सॅनिटायझर घेऊन आलेले व मास्क घातलेले विद्यार्थी वर्गात दिसून येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहरी भागात सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या आहेत. असे असले तरी ग्रामीण भागात सकाळी अकरापासून शाळा सुरू होणार आहेत. तालुक्यातील शाळांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.
हेही वाचा-MH Primary School Opening : जाणून घ्या, कुठे कधी सुरू होणार शाळा
शिक्षण विभागाच्या शाळांना दक्षतेच्या सूचना
शाळा सुरू होणार असे परिपत्रक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळा सॅनिटाईज करण्यात ( Nandurbar ZP schools sanitization ) आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी विशेष काळजी घेण्याचे शिक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे व विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध करून देण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिली आहे.
हेही वाचा-Maharashtra Primary Schools : राज्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून होणार सुरू
शिक्षकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
जिल्ह्यातील 99 टक्के शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लस ( teachers 99 percentage vaccination in Nandurbar ) घेतली आहे. उर्वरित शिक्षकांनी वैद्यकीय कारणांमुळे लस घेतली नसल्याची माहिती जिल्हा जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी ( primary education officer Rahul Chaudhary ) डॉ. राहुल चौधरी यांनी दिली आहे.
शिक्षण विभागातर्फे पथकांची नियुक्ती
शिक्षण विभागाकडून 176 पथकांची जिल्हाभर नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकातील अधिकारी प्रत्येक शाळेत जाऊन आढावा घेणार आहेत.
हेही वाचा-Schools in Pune - कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद
विद्यार्थ्यांची ग्रामीण भागात 90 टक्के उपस्थिती-
विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत हजर राहिले आहेत. तर पालकांनीदेखील संमती पत्र देत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ( Nandurbar ZP CEO on schools reopening) यांनी दिली आहे.
मुंबई व पुण्यातील प्राथमिक शाळा 15 डिसेंबरपासून होणार सुरू-
राज्यातील आणि शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (Maharashtra School Reopen) 1डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेने शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.