नंदुरबार - जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडून सेना-काँग्रेस युती तोडण्यासाठी विविध कुरघोड्या होत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, जोपर्यंत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे तोपर्यंत आम्ही युती तोडणार नाही, असे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपला 23-23 जागा मिळाल्या होत्या. सेना-काँग्रेसच्या युतीने जिल्हा परिषदेची सत्ता महाविकास आघाडीकडे गेले होती. मात्र, आवघ्या काही दिवसात जिल्हा परिषदेत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येऊन आघाडी तयार केली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाले. यात अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून दोन युवा चेहरे समोर आले. जिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत होत असतानाच भाजपने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरणसभेत भाजप आक्रमक झाली तर सेना उस्थितीत राहिली नाही. त्यामुळे अनेक चर्चांना उत आला होता. मात्र, सेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी जोपर्यंत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तोपर्यंत सेना-कॉंग्रेससोबत राहील, असे सांगितले. यामुळे विविध चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन इफेक्ट : नंदुरबारमध्ये मिरचीची लागवड लांबली; मिरचीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता