ETV Bharat / state

पोटाची भूक आता भय मानायला तयार नाही; रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर

author img

By

Published : Sep 13, 2020, 12:29 PM IST

लॉकडाऊन काळात आपापल्या गावी परतलेल्या मजुरांनी रोजगारासाठी स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. यातील बहुतांश मजुरवर्ग हा गुजरात आणि मध्य प्रदेशकडे रवाना होताना पाहायला मिळत आहे.

Nandurbar workers in search of employment go to gujarat and madhya pradesh state
पोटाची भूक आता भय मानायला तयार नाही; रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर

नंदुरबार - कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिक गडद होत चालले आहे. तर दुसरीकडे पोटाची भूक आता भय मानायला तयार नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळात आपापल्या गावी परतलेल्या मजुरांनी रोजगारासाठी स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. यातील बहुतांश मजुरवर्ग हा गुजरात आणि मध्य प्रदेशकडे रवाना होताना पाहायला मिळत आहे.

नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुबलक प्रमाणात रोजगार येथे उपलब्ध नाही. यामुळे दरवर्षी जिल्ह्यातून गुजरात आणि मध्य प्रदेश येथे मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या कारणाने आपापल्या गावी, मजूर मिळेल त्या मार्गाने पोहोचले. हे संकट काही दिवसात संपेल, अशी त्यांची आशा होती.

पण, दिवसागणिक कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यात दुसरीकडे रोजगार नसल्याने पोटाची खळगी भरायची कशी? हा प्रश्न मजुरवर्गासमोर उभा राहिला. तेव्हा मजूरांना कोरोनापेक्षा पोटाचीच भीती वाटू लागली. यामुळे ते रोजगारासाठी जवळ असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेशकडे स्थलांतर करत आहेत.

पोटाची भूक आता भय मानायला तयार नाही...

दिवसा हजारोंच्या संख्येने नागरिक कुटुंबासह स्थलांतर करत आहेत. गुजरातसह इतर जिल्ह्यात मजुरांना भरपूर काम उपलब्ध होत असल्यामुळे व रोजंदारीही दिवसाआड मिळत असल्याने तिथे जाण्याचा ओढा मजूरांचा आहे. तीच पध्दत रोहयोसाठी राबवल्यास याठिकाणी मजुरांचे स्थलांतराला आळा बसेल, असे मजुरांचे म्हणणे आहे. दरम्यान, मजूरांचे हे स्थलांतर रोखण्यास राज्य सरकारला अपयश आल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - शिवण नदीच्या पुरात दोघे अडकले; नागरिकांच्या मदतीने बचावले

हेही वाचा - नंदुरबारमध्ये कंगना रणौतच्या प्रतिमेला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने 'जोडेमारो आंदोलन'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.