नंदुरबार - अखेर 45 दिवसांनी धडगाव तालुक्यातील खडक्या येथील पीडित मुलीचा ( nandurbar rape case ) मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनात न्याय न मिळाल्याने आणि बलात्कार होऊन हत्या झाली असतांना आत्महत्येचा गुन्हाच दाखल झाल्याचा पीडितेच्या ( victim body awaits cremation from 42 days ) वडिलांनी केला होता. त्यांनी मुलीचा मृतदेह 45 दिवसांपासुन मिठाच्या खड्यात पुरुन ठेवला होता. पीडीत कुटुंबाच्या मागणीनुसार मुंबईतील जे.जे रुग्णालयात ( father fight for daughters justice ) मृतदेह पुर्नशवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दोन दिवसांपासुन पोलीस तिच्या कुटुंबीयांची भेट घेवुन शवविच्छेदनासाठी तिच्या कुटुंबीयांची ( rape and murder of woman in Nandurbar ) समजुत काढत होते. अखेर कुटुंबीयांनी केलेल्या मुंबईतील शवविच्छदेनाला प्रतिसाद देत पोलीस आरोग्य पथकासह काल सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. पीडीत कुटुंबाच्या मागणीनुसार मुंबईतील जे.जे रुग्णालयात ( girl body buried in salt ) मृतदेह पुर्नशवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
काय घडली होती घटना? बलात्कार करून खून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप ( Relatives allege rape and murder ) विवाहीत मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवासी रणजीत ठाकरे आणि अन्य एकजण बळजबरीने गाडीवर बसवून 01 ऑगस्ट 2022 ला गावाबाहेर घेवुन गेले. यानंतर मुलीने नातलगाला आलेल्या फोनमध्ये तिच्यासोबत रणजीतसह चार जणांनी चित्रपटाप्रमाणे कुकर्म करत असल्याचे तिने सांगितले. ते मारुन टाकतील असे मृत पीडितेने सांगितले. काही काळातच तिने एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांना फोन आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलीसांना सांगूनदेखील मृत पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. तिच्या आत्महत्येचा बनाव (Faking suicide) रचण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
ग्रामस्थांनी कुटुंबाला दिली साथ-पित्याने मिठात पुरून ठेवला मुलीचा मृतदेह शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलीसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवुन घेतला. आणि या प्रकरणात संशयीत रणजीत ठाकरेसह तिघांना अटक केली. मात्र, मुलीवर बलात्कार होवुन तिची हत्या झाली असताना पोलीसांच्या या भुमिकेमुळे मुलीचे मृतदेह अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर वडिलांनी अंत्संसंस्कार केले नाहीत. त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातचं आपल्या मुलीच्या मृतदेहाला पुरले आहे. कठीण प्रसंग ग्रामस्थदेखील कुटुंबीयासमवेत उभे आहेत.
मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं पिडीतेच्या वडिलांचं गाऱ्हाणे ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्र्याच्या कानावरही अंतीम संस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. पीडितेचा मृत्यू आधी व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लीपची तपासणी करुन त्यात जर तथ्य असेल तर त्याबाबत पोलिसांनी आधीच ठोस पाऊल उचलने गरजेचे होते. अशातच तिच्या आत्महत्या झालेल्या फोटोमधुनदेखील काही तात्रींक बाबी उपस्थित करत प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. त्यामुळेच शवविच्छेदन अहवालानंतर प्रशासन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.