नंदुरबार - उतारवयात निराधार लोकांसाठी जीवन व्यथित करणे कठीण काम आहे. नंदुरबार महानगरपालिका आणि माजी आमदार चंद्रकात रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने निराधार आणि भीक मागणाऱ्या लोकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून पालिका स्वखर्चावर या लोकांची काळजी घेत होती, आता दीनदयाळ आधार योजनेचे अनुदान मिळणार असल्याने आश्रमाची आर्थिक चणचण दूर होणार आहे.
नंदुरबार शहर हे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर असल्याने या ठिकाणी भिकारी आणि निराधार लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला अनेक समस्यांना निर्माण होत होत्या. या गोष्टी लक्षात घेऊन महानगरपालिकेने २०१७ मध्ये आधार निराधार केंद्र सुरू केले. त्यात शेकडो निराधार आणि भिकारी येऊन राहत आहेत. त्यांना सकाळी नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण आणि दर आठवड्याला वैद्यकीय तपासणी या सुविधा दिल्या जातात. या ठिकाणी माजी आमदार चंद्रकात रघुवंशी मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि पालिका कर्मचारी या नागरिकांची काळजी घेण्याचे काम करतात.