ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये तापमानवाढीचा प्रचाराला फटका, उष्णतेमुळे नेत्यांच्या प्रचाराला कार्यकर्त्यांची अनुपस्थिती

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंशांवर गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास झाला.

डॉ. हिना गावित
author img

By

Published : Apr 27, 2019, 11:39 PM IST

नंदुरबार - संपूर्ण महाराष्ट्रात तापमान वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. जिल्ह्याचा तापमानाचा पाराही ४४ अंशांवर गेल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास झाला. यामुळे नेत्यांच्या प्रचाराला कमी गर्दी होताना दिसली.

निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवार

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या ४ दिवसांच्या प्रचारात उमेदवारांना वाढत्या तापमानाचा फटका बसला. या मतदारसंघात एकूण ११ उमेदवार उभे आहेत. पण कोणत्याच उमेदवाराकडून यावेळी मोठा प्रचार झाला नाही. त्यामुळे हे उमेदवार आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचू शकले नाही.

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवार के. सी. पाडवी, भाजप उमेदवार डॉ. हिना गावित, अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांनी अनेक ठिकाणी पदयात्रा आणि मोटार सायकल रॅली काढल्या. आज या उमेदवारांनी अक्कलकुवा, शहादा, धडगाव, तळोदा, शिरपूर आणि साक्री या ठिकाणी रॅली काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

ही बातमी वेब मोजोवरून पाठवली आहे,

नंदुरबार लोकसभा मतदार संघात आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदारापर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला काँग्रेस उमेदवार के सी पाडवी भाजपा उमेदवार डॉ हिना गावित,अपक्ष उमेदवार डॉ सुहास नटावदकर यांनी अनेक ठिकाणी पदयात्रा तर काही ठिकाणी मोटार सायकल रॅली काढल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघातील अक्कलकुवा शहादा धडगाव तळोदा शिरपूर साक्री या ठिकाणी रॅली काढून जास्तजास्त मतदारां पर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे, 

एकूण शेवटच्या चार दिवस प्रचारात उमेदवारांना वाढत्या तापमानाचा फटका बसला आहे, नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंश पर्यत गेला आहे त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा पारा यावेळेस खूप कमी प्रमाणात दिसला,

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार उभे आहेत परंतु कोणत्याच उमेदवाराकडून यावेळेस मोठा प्रचार झालेला नाही काही आदिवासी पाड्यांमध्ये उमेदवार पोहोचू शकले नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.