ETV Bharat / state

काँग्रेसला ७० वर्षांत जमले नाही ते मी केले - हिना गावित - हिना गावित

नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचा अद्यापही कुठलीही मोठी प्रचार सभा झालेली नाही. याऊलट गावित यांनी मोदींच्या सभेनंतर प्रत्येक तालुक्यात सभांचा सपाटा लावला आहे.

खासदार हिना गावित
author img

By

Published : Apr 24, 2019, 11:47 PM IST

नंदुरबार - गेल्या साडेचार वर्षातील योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला आहे. गेल्या ७० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मी साडेचार वर्षात करून दाखवले असल्याचे वक्तव्य नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांनी केले आहे.

खासदार हिना गावित

हिना गावित काँग्रेस उमेदवार के. सी. पाडवी यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या आहे. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये खरी लढत रंगणार आहे. मात्र, नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचा अद्यापही कुठलीही मोठी प्रचार सभा झालेली नाही. याऊलट गावित यांनी मोदींच्या सभेनंतर प्रत्येक तालुक्यात सभांचा सपाटा लावला आहे. त्यामधून त्या भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा गड होता. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून हिना गावित यांनी बाजी मारली होती. यावेळेस मात्र काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये 'काँटे की टक्कर' होण्याचे संकेत दिसत आहे.

Intro:नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार के सी पाडवी आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित या दोन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये खरी लढत रंगताना दिसत आहे मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अजून कोणतीही मोठी प्रचार सभा झालेली नाही भाजपा उमेदवार हिना गावित यांनी मोदींच्या सभेनंतर प्रत्येक तालुक्यात स्वतः जाऊन रॅली काढून सभा घेत प्रचार सुरू केला,Body:गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकार कडून मोठ्या प्रमाणावर योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला आहे त्यात उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुलभ सोचालय, सौभाग्य योजना हर घर बिजली द्वारे गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने जे काम केलं नाही ते मी साडे चार वर्षात करून दाखवलं असा दावा हिना गावित यांनी केला आहे
Conclusion:नंदुरबार लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा गड होता मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोदी लाटेमुळे भारतीय जनता पार्टी कडून हिना गावित यांनी बाजी मारली होती यावेळेस मात्र काँग्रेस आणि बीजेपी उमेदवारांमध्ये काटे की टक्कर होण्याचे संकेत दिसत आहे

बाईट :- डॉक्टर हिना गावित उमेदवार भाजपा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.