ETV Bharat / state

स्वतःवर गोळी झाडून एकाची आत्महत्या, नंदुरबारातील घटना

author img

By

Published : Jan 1, 2020, 1:16 PM IST

Updated : Jan 1, 2020, 2:51 PM IST

शहरातील एका मंदिरात स्वतःच्या छातीवर गोळी झाडून एकाने आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.

nandurbar
सिंधी कॉलनीजवळील मंदिरात एकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

नंदुरबार - शहरातील एका मंदिरात स्वतःवर गोळी झाडून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हरदेवसिंग नरेंद्रसिंग विरदी (वय 35) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मध्यप्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील डवरा येथील हरदेवसिंग हा काल सायंकाळी नवी सिंधी कॉलनीजवळ असलेल्या एका मंदिरात दर्शनासाठी आला होता. मंदिरात आल्यानंतर त्याने गावठी पिस्तूलने स्वतःच्या छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात हरदेवसिंग खाली कोसळला, दरम्यान गावठी कट्ट्यामधून गोळी सुटल्याचा आवाज झाल्यानंतर मंदिराबाहेरील नागरीक मंदिरात पळत आले. यावेळी हरदेवसिंग हा खाली पडलेला दिसला. परिसरात घटनेची वार्ता कळताच मंदिरात एकच गर्दी झाली.

पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली आणि हरदेवसिंग यास उपचाराकरता नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच हरदेवसिंग यांची प्राणज्योत मालवली होती. मृत हरदेवसिंग हे नंदुरबार येथे मेहुण्याकडे आले होते, त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येप्रकरणी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असा उल्लेख केला आहे.

हेही वाचा - 700 विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार घालून केले नवीन वर्षाचे स्वागत

दरम्यान, हरदेवसिंग विरदी यांच्या आत्महत्येप्रकरणी तर्कवितर्क लावले जात आहेत. वर्षाच्या शेवटच्या सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी लखन रोशनलाल बालाणी यांच्या माहितीवरून उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भापकर करीत आहेत.

हेही वाचा - नंदुरबार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : 594 उमेदवार रिंगणात, बहुरंगी लढतीने प्रचाराला सुरुवात

Intro:नंदुरबार - शहरातील एका मंदिरात स्वतःच्या छातीवर गोळी झाडुन एकाने आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.Body:मध्यप्रदेश राज्यातील ग्वालियर जिल्ह्यातील डवरा येथील हरदेवसिंग नरेंद्रसिंग विरदी (35) हा काल सायंकाळी नवी सिंधी कॉलनीजवळ असलेल्या एका मंदिरात दर्शनासाठी आला होता. मंदिरात आल्यानंतर त्याने गावठी पिस्तुलने स्वतःच्या छातीवर गोळी झाडुन आत्महत्त्या केली. रक्ताच्या थारोळ्यात हरदेवसिंग विरदी खाली कोसळला. दरम्यान गावठी कट्यामधुन गोळी फायर झाल्यानंतर बॉम्बसारखा आवाज झाल्याने मंदिराबाहेरील नागरीक मंदिरात पळत आले. यावेळी हरदेवसिंग विरदी हा खाली पडलेला दिसला. घटनेची वार्ता परिसरात कळताच मंदिरात एकच गर्दी झाली. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली. अ‍ॅम्बुलन्सद्वारे हरदेवसिंग विरदी यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच हरदेवसिंग विरदी याची प्राणज्योत मालवली होती. हरदेवसिंग विरदी हा नंदुरबार येथील मेहुणे यांच्याकडे आला होता. मयत विरदी याच्या खिश्यात सुसाईडनोट आढळुन आली आहे. या सुसाईडनोटमध्ये आपल्या आत्महत्त्याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरण्यात येवु नये, असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, हरदेवसिंग विरदी याच्या आत्महत्त्येप्रकरणी तर्कवितर्क लावले जात आहे. वर्षाच्या शेवटच्या सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Conclusion:लखन रोशनलाल बालाणी याच्या खबरीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भापकर करित आहेत.
Last Updated : Jan 1, 2020, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.