नंदुरबार - जिल्ह्यात धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देऊ केल्याने सरकारच्या विरोधात आदिवासी समाजाने महामोर्चा काढला. राज्य शासनाने धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देऊ केल्याने त्याचा विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाने जिल्ह्यात आज महामोर्चा काढला आहे. या मोर्चाला नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप चौक येथून सुरुवात झाली.
आदिवासी महामोर्चा थेट जिल्हाधिकार्यालय वर धडकणार आहे. विविध संघटनांनी एकत्र येत या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये हजारो आदिवासी नागरिक सहभागी झाले आहे