नंदुरबार- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र, ज्वारीवर लष्करी आळींचा प्रादुर्भाव झाल्याने एकट्या प्रकाशा परिसरातील १५०० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी ज्वारीचे पीक उध्वस्त झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे वेळ आली आहे.
अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामाकडे लागून होत्या. शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. मात्र, ज्वारीच्या पिकावर लष्करी अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे जवळपास १५०० हेक्टरवरील ज्वारीचे पीक उध्वस्त झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे अजूनही पंचनामे होणे बाकी असतांना शेतकऱ्यांसमोर लष्करी अळींमुळे दुबार पेरणीची वेळ येऊन ठेपली आहे. कृषी विभागाने लष्करी अळींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून किटकनाशके उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा- बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था; दुरुस्त न झाल्यास महामार्ग बंदचा इशारा