ETV Bharat / state

नंदुरबार येथे पोलीस उपनिरीक्षकाची पत्रकारांना धक्काबुक्की - स्वातंत्र्यावर

वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस उपनिरीक्षकाने अरेरावी करीत धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगून गुन्हा नोंदवण्याचीही धमकी त्याने दिली. त्याच्यानिषेधार्थ नंदुरबारमधील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत निषेध नोंदविला.

जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्रकारांनी निवेदन दिले
author img

By

Published : Jun 9, 2019, 10:52 AM IST

नंदुरबार - जळगाव घरकुल घोटाळ्याच्या निकालाबाबतचे वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस उपनिरीक्षकाने अरेरावी करीत धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगून गुन्हा नोंदवण्याचीही धमकी त्याने दिली.

पोलीस उपनिरीक्षकाच्या निषेधार्थ पत्रकारांनी निषेध व्यक्त केला
धुळे येथील न्यायालयात जळगाव घरकुल घोटाळ्याच्या निकालाबाबतची शनिवारी सुनावणी सुरू होती. यावेळी तेथे वृत्त संकलनासाठी पत्रकारांचीही उपस्थिती होती. एका खासगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी, वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश सूर्यवंशी, विजय शिंदे यांच्यासह इतर पत्रकारांना धुळे येथील पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांनी अरेरावी करीत धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगून गुन्हा नोंदविण्याचीही धमकी दिली.संबंधित पोलीस अधिकाऱ्याने पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली. त्यामुळे त्याच्यानिषेधार्थ नंदुरबारमधील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत निषेध नोंदविला. तसेच नंदुरबार जिल्ह्यात, अशा घटना घडू नये, अशी मागणी केली आहे. पत्रकारांवर झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पत्रकारांनी काळ्या फिती लावून घोषणाही दिल्या.

Intro:या बातमीचे vis byte एडिट करून पाठवत आहे

झी24तास वृत्तवाहिनीचे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी, दिव्य मराठीचे प्रतिनिधी गणेश सूर्यवंशी, सकाळ समूहाचे विजय शिंदे व इतर पत्रकार धुळे जिल्ह्यातील न्यायालयाच्या आवारात जळगाव घरकुल घोटाळ्याच्या निकालाबाबतचे वृत्त संकलनासाठी गेले असताना धुळे येथील पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांनी पत्रकारांबरोबर अरेरावी करीत धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगून गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली.

संबंधित पोलिस अधिकाऱ्याने पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार केल्याने शनिवारी नंदुरबार मधील पत्रकारानी या घटनेचा निषेध करत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि नंदुरबार अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आणि नंदुरबार जिल्ह्यात अशा घटना घडू नये अशी मागणी केली आहे.Body:संबंधित पोलिस अधिकाऱ्याने पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार केल्याने शनिवारी नंदुरबार मधील पत्रकारानी या घटनेचा निषेध करत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि नंदुरबार अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आणि नंदुरबार जिल्ह्यात अशा घटना घडू नये अशी मागणी केली आहे.Conclusion:नंदुरबार मधील पत्रकारांनी धुळे येथे पत्रकारांवर झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून घोषणाही दिल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.