नंदुरबार - दोन गावठी पिस्तुलसह पाच तलवारी आणि 11 जिवंत काडतूस अक्कलकुवा येथील नदीकाठ परिसरातून जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोघांविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
55 हजारांचा मुद्देमाल जप्त
अक्कलकुवा येथील नदीकाठी परिसरात गावठी पिस्तुल व तलवारींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार अक्कलकुवा पोलीसांनी नदीकाठी धाड टाकून 55 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्तुल, तसेच 1100 रुपये किंमतीचे 11 व 500 रुपये किंमतीचे 5 जीवंत काडतुस, 2500 रुपये किंमतीचे 5 लोखंडी तलवारी जप्त केल्या. पो कॉ.विजय गोपाल विसावे यांच्या फिर्यादीवरुन राजूसिंग जालमसिंग शिकलीकर (रा.शिखफळी ता.अक्कलकुवा), कैलास जालमसिंग नाईक (रा.आमलीफळी खापर) यांच्याविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1), (3)चे उल्लंघन 135 सह फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 या कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस व तलवारी हे राजुसिंग शिकलीकर, कैलास नाईक यांच्या ताब्यात घेतले.
दोन दिवसांची पोलीस कस्टडी
दोघा संशयित आरोपींना अक्कलकोट पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांनी अटक केल्यानंतर त्यांना अक्कलकुवा कोर्टात दाखल करण्यात आले. त्यांना, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - मन की बात' : #cheer4India हॅशटॅगसह खेळाडूंना पाठिंबा द्या, मोदींचे आवाहन