नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील कोराई शिवारात पोलिसांनी एका घरावर छापा टाकून 4 लाखांचा विदेशी अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत अवैधरित्या मद्यसाठा केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा... काँग्रेस पक्षाचा 28 डिसेंबरला ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा
अक्कलकुवा तालुक्यातील कोराई शिवारात गोटपाडा रस्त्यावर असलेल्या राजु पारत्या पाडवी याच्या घरात विदेशी मद्याचा अवैधसाठा असल्याची पोलिसांना खबर मिळाली होती. राजू हा साठा करून दारू विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वेषांतर करुन राजु पाडवी याच्या घराच्या परिसरात सापळा लावला होता.
हेही वाचा... बाळासाहेबांचे कौतुक करावे तेवढे थोडेचं कारण....
पोलीस आपल्या घरावर छापा टाकणार असल्याची माहिती मिळाल्याने राजू व त्याचा सहकारी घराला कुलूप लावून फरार झाले होते. पोलिसांच्या पथकाने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना घरात विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांना हा सर्व माल जप्त केला असून घरातून एकूण 3 लाख 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा... 'चिखल करा आणि कमळ फुलवा असे आता चालणार नाही'
पोलीस कर्मचारी कारवाई करत असताना दारू विक्रेता मनोज मगन चौधरी (रा. खापर) हा घटनास्थळी येऊन पोलिसांना पाहत पळून गेला. पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग केला असता त्याच्या चारचाकी वाहनातुन तो पसार झाला. आरोपी राजु पारत्या पाडवी (रा. कोराई), मनोज मगन चौधरी (रा.खापर) या दोघांविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.