ETV Bharat / state

आठ लाखांच्या अवैध दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त; मोलगी पोलिसांची कारवाई - illegal liquor news from nandurbar

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जीपसह आठ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसातील सलग तिसऱया कारवाईमुळे अवैध मद्य वाहतूक व विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

illegal liquor seized in nandurbar
आठ लाखांच्या अवैध दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Dec 9, 2019, 3:28 PM IST

नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जीपसह आठ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसातील सलग तिसऱया कारवाईमुळे अवैध मद्य वाहतूक व विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

मोलगी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार हे मोलगी रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी त्यांना धडगावहून मोलगीकडे अवैधरित्या मद्य वाहतूक होत असल्याची गुप्तवार्ता मिळाली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार व अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक पगार यांनी फौजदार पी.पी.सोनवणे, पो.कॉ.रवींद्र कुवर व अन्य कर्मचाऱयांसह भगदरी फाट्या जवळ सापळा रचला. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास जीप (एमएच 04 एफजे6867) ही चारचाकी अडवली.

संबंधित जीपची तपासणी केल्यानंतर यामध्ये मध्यप्रदेश मधील बनावटीचे मद्य आढळले. यानंतर पोलिसांनी वाहनचालक संजय कागडा पाडवी (रा.कुंडलचा) याला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पी.पी. सोनवणे करत आहेत.

Intro:नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिसांनी 15 दिवसाच्या आत सलग तिसर्‍यांदा अवैध मद्यसाठा जप्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे अवैधरित्या मद्य वाहतूक व विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत जीपसह आठ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.Body:मोलगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार हे सहकार्‍यांसह मोलगी ते धडगाव रस्त्यावर गस्त घालत असतांना धडगावहून मोलगीकडे अवैधरित्या मद्य वाहतूक होत असल्याची गुप्तवार्ता मिळाली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार व अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पगार यांनी फौजदार पी.पी.सोनवणे, पो.कॉ.रवींद्र कुवर, पो.नाईक गुलाब वसावे, पो.कॉ.दीपक वारूळे,पो,कॉ. बापूशेमळे, पो.कॉ.सतिष तावरे, पो.कॉ.देवानंद कोळी, पो.कॉ. अमोल शिरसाठ, पो.कॉ.सगुन थोरे, पो.कॉ.पिंटू पावरा, महिला पोलीस कॉ.मंगला पावरा यांच्यासह भगदरी फाट्या जवळ सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास जीप क्रमांक एमएच 04- एफजे-6867 ला अडवून तपासणी केला असता या जीपमध्ये मध्यप्रदेश बनावटीची टँगो व बिअरचे बॉक्स आढळून आले असता वाहनचालक संजय कागडा पाडवी रा.कुंडलचा पाटीलपाडा यास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत जीपसह आठ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पी.पी. सोनवणे करीत आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.