ETV Bharat / state

नंदुरबार: तीनखुन्या परिसरात साडेसहा लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त - नंदुरबार अवैध विदेशी मद्य जप्त

तीनखुन्या येथील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध विदेशी मद्यसाठा लपवण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने शेतात पहाटे एकच्या सुमारास छापा टाकत अवैध विदेशी मद्य जप्त केले.

अवैध विदेशी मद्यसाठा
author img

By

Published : Nov 20, 2019, 10:01 PM IST

नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुन्या(मोरखी)परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून साडे सहा लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीनखुन्या परिसरात साडेसहा लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त

तीनखुन्या येथील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध विदेशी मद्यसाठा लपवण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने शेतात पहाटे एकच्या सुमारास छापा टाकत अवैध विदेशी मद्य जप्त केले. यात व्हिस्कीची 74 खोकी, बिअरची 74 खोकी असा एकूण 6 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा - 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

आरोपी किसन वसावे हा फरार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, नंदुरबार अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनोजकुमार संबोधी, अनुपकुमार देशमाने, हेमंत पाटील, अजय रायते, अविनाश पाटील, अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बडगुजर, पोलीस हवालदार जाधव, विनोद पाटील यांनी ही कारवाई केली.

Intro:नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुन्या (मोरखी) परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकुन साडे सहा लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला असून एकाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.Body:अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुन्या (मोरखी) येथील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध विदेशी मद्यसाठा लपविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली होती. भरारी पथकाने तीनखुन्या (मोरखी) येथील शेतामध्ये पहाटे 1 वाजेच्या सुमारास छापा टाकुन अवैध विदेशी मद्य जप्त केले. यात बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे 74 बॉक्स, सोमपॉवर सुपर स्ट्राँग बिअरचे 74 बॉक्स असा एकुण 6 लाख 46 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी किसन रामा वसावे याच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. किसन वसावे हा फरार झाला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, नंदुरबार अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनोजकुमार संबोधी, अनुपकुमार देशमाने, हेमंत पाटील, अजय रायते, अविनाश पाटील, अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बडगुजर, पोलीस हवालदार जाधव, विनोद पाटील यांनी सदर कारवाई केली.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.