नंदुरबार - नवापूर तालुक्यातील झामणझर गावातून गुजरात राज्यात छुप्या मार्गाने दारूची तस्करी सुरू झाल्याची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये दोन गाड्या, एक टेम्पो तसेच अवैध देशी दारूचे 360 बॉक्स हस्तगत झाले आहेत.
लाॅकडाऊन दरम्यान गुजरातमध्ये दारूची मागणी वाढल्याने तस्करीला उधाण आले आहे. झामणझर गावातून गुजरात राज्यात छुप्या मार्गाने दारूची तस्करी सुरू झाली आहे. यासंबंधी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला; आणि यानंतर कारवाई दरम्यान २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अनिल मनोहर जवंजाळ (वय 42), अशोक लोटन मराठे (वय 50) यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी मुन्ना गामित यासह दोन चालक अद्याप फारार असून जिल्हा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले तसेच महेंद्र नगराळे, शांतिलाल पाटील, दादाभाई वाघ,इ. यांच्या युनिटने संबंधित कारवाई केली आहे.