ETV Bharat / state

सारंगखेडा चेतक महोत्सवामध्ये अश्व सौंदर्य स्पर्धेचे आयोजन - अश्व सौंदर्य स्पर्धा सारंगखेडा

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धांची सर्वाधिक रंगात पहायला मिळते. कोट्यवधी रुपये किंमत असलेले अश्व येथे पहायला मिळत आहेत. घोड्यांची ही सौंदर्य स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात संपन्न होत असून शंभर पेक्षा जास्त घोड्यांनी सहभाग नोंदवला.

सारंगखेडा चेतक फेस्टिवल
सारंगखेडा चेतक फेस्टिवल
author img

By

Published : Dec 22, 2019, 10:10 PM IST

नंदुरबार - महिला आणि पुरुषांच्या जशा सौंदर्य स्पर्धा होतात, तशाच त्या घोड्यांच्याही होत असतात. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धांची सर्वाधिक रंगात पहायला मिळते. सारंगखेडा येथे सुरु असलेल्या घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धेत देशभरातील नामवंत अश्व शौकिनांनी आपले अश्व या स्पर्धेसाठी आणले आहेत.

सारंगखेडा चेतक महोत्सवामध्ये अश्व सौंदर्य स्पर्धा

घोड्यांची चाल, त्यांचा रंग, रुबाब, त्यांची ठेवन आणि घोड्याचा स्वभाव हे या स्पर्धेचे निकष आहेत. कोट्यवधी रुपये किंमत असलेले अश्व येथे पहायला मिळत आहेत. घोड्यांची ही सौंदर्य स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात संपन्न होत असून शंभरपेक्षा जास्त घोड्यांनी सहभाग नोंदवला.

हेही वाचा - अमरावतीच्या अवलियाने बांधले 'प्लास्टीकचे घर'

या स्पर्धेत घोड्यांच्या सर्व गुणांचा कस लागतो. त्यामुळे स्पर्धेतील घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो अश्व शौकीनांनी सारंगखेड्यात हजेरी लावली. देशभरातून आलेले अश्वतज्ञ या स्पर्धेचे परिक्षण करतात.

Intro:नंदुरबार - महिला आणि पुरुषांच्या जश्या सौंदर्य स्पर्धा होतात तश्याच त्या घोड्यांच्याही होत असतात. राज्यात या घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धांची रंगात सर्वाधिक पाहायला मिळते ती नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी किनारी सुरु असलेल्या घोडे बाजारात.. कशी असते हि घोड्यांची सौंदर्य स्पर्धा चला तर बघुयात.. Body:घोड्यांची चाल... त्यांचा रंग.. रुबाब.. त्यांची ठेवणं आणि घोड्याचा स्वभाव... सौदर्यवतीनप्रमाणे  घोड्यांचा याठिकणी रम्पवाक....  हे निकष आहेत. सारंगखेडा येथे सुरु असलेल्या घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धेचे देशभरातील नामवंत अश्व शौकिनांनी आपले घोडे या स्पर्धेसाठी तापी नदी किनारी भरणाऱ्या या यात्रेत आणले आहेत. कोट्यवधी रुपये किंमत असलेले हे घोडे खास सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दाखल झाले आहेत. देश भरातील अश्व शौकीनांसाठी पर्वणी असलेल्या चेतक फेस्टिव्हल मधील अश्व सौदंर्य स्पर्धेला सारंगखेड्याच्या घोडे बाजारात चांगलेच रंग भरत आहे. घोड्यांची हि सौंदर्य स्पर्धा वेगवेगळ्या चार गटात संपन्न होत आहे. या सौदर्य स्पर्धेत १०० हुन अधिक घोड्यांनी सहभाग नोंदविला. 
पांढऱ्या रंगाचे घोडे ... मारवाड ... एकदंत ... मोठे घोडे अश्या विविध प्रकारात या स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेत घोड्याचे सर्वगुणांचा कस लागतो. त्यामुळे हे स्पर्धेतले घोडे विशेष काळजीने सांभाळे जातात. हि स्पर्धा पाहण्यासाठी हजारो अश्व शौकीनांनी सारंगखेड्यात हजेरी लावली होती. देशभरातून आलेल्या अश्वतज्ञ या स्पर्धेचे परीक्षण करीत असतात. 

घोड्यांच्या ह्या सौंदर्य स्पर्धेत 'शान' हा सर्वात्तम घोडा थेट पंजाब मधून सारंगखेड्यात दाखल झाला आहे. शान प्रमाणेच देशातील काण्यकोपऱ्यातून घोडे या सौंदर्य स्पर्धा गाजवायला दाखल झाले आहेत.

BYTE - विवेक वाडीले,
सदस्य- अश्व सौंदर्य स्पर्धा समिती, सारंगखेडा Conclusion:BYTE - विवेक वाडीले,
सदस्य- अश्व सौंदर्य स्पर्धा समिती, सारंगखेडा 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.