ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, दोघे जखमी; पीकांचेही नुकसान - heavy rain in Nandurbar

जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अनेक घरांवरील पत्रे उडून गेली.

Nandurbar
नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने लावली हजेरी
author img

By

Published : Mar 25, 2020, 7:52 PM IST

नंदुरबार - हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आज शहरात खरा ठरला आहे. शहर व परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडला. या वादळी वाऱ्यात अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत.

नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने लावली हजेरी

हेही वाचा - COVID19: नंदुरबारमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक गावात औषध फवारणी...

जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच नवापूर शहरातील 4 ते 5 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. यावेळी घरांची पडझड झाल्यामुळे 2 जण जखमी झाले आहेत.

त्यामुळे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे गहू व हरभरा पिक तयार झाले असून पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये संचारबंदीचे उल्लंघन.. ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.