नंदुरबार - जिल्ह्यात मागील ४ वर्षापासून पाऊस पडला नाही. यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आणि चारा टंचाईची परिस्थिती आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला.
रोजगार उपलब्ध नसेल अशा ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा. पाणी टंचाई आहे अशा ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात येणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी टँकर सुरू करण्यात येतील. गरज आहे त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याच्या सूचना पालक मंत्र्यांनी दिल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत खासदार डॉ. हिना गावित आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
काही ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केला रोष -
पालकमंत्र्यांनी दुष्काळी भागातील गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील पाणी टंचाई चारा टंचाई आदी विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. काही गावात मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना पाणी टंचाईच्या विषयावर नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.