ETV Bharat / state

श्रीकृष्ण ज्वेलर्समध्ये भरदिवसा अडीच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

author img

By

Published : Sep 23, 2020, 2:43 PM IST

Updated : Sep 23, 2020, 3:07 PM IST

चोरट्याने सोन्याचे दागिने दाखविणार्‍या दुकानातील ज्येष्ठ नागरिकाची दिशाभूल करत ही चोरी केली. पाचशे रुपयांची नोट देऊन चोरट्याने सुमारे साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा चोरटा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, याच दुकानात तीन वर्षांपासून अशाच प्रकारची चोरी झाली होती.

नंदुरबार श्रीकृष्ण ज्वेलर्स चोरी
नंदुरबार श्रीकृष्ण ज्वेलर्स चोरी

नंदुरबार - शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे सोने खरेदीच्या बहाण्याने भरदिवसा तब्बल अडीच लाखांच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. दुकानात आलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने दाखविणार्‍या दुकानातील ज्येष्ठ नागरिकाची दिशाभूल करत ही चोरी केली. पाचशे रुपयांची नोट देऊन चोरट्याने सुमारे साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा चोरटा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे याच दुकानात तीन वर्षांपासून अशाच प्रकारची चोरी झाली होती.

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील सेंट्रल बँकेजवळ नरेंद्र सोनार यांचे श्रीकृष्ण ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात दुपारच्या सुमारास एक तरुण डोक्यावरील टोपीला चष्मा लावून आणि तोंडाला रुमाल बांधून आला. सोने खरेदी करणार असल्याचे सांगून काऊंटरजवळ उभा राहिला. नरेंद्र सोनार यांच्या वडिलांनी त्यास सोने दाखविण्यास सुरुवात केली. या चोरट्याने हातात पाचशेच्या नोटा दाखवत सोने खरेदी करत असल्याचा बहाणा करून सोनार यांच्या वडिलांची दिशाभूल केली. नंतर अडीच लाखांचे साडेचार तोळे सोने घेऊन पोबारा केला. नरेंद्र सोनार यांनी लागलीच सारंगखेडा पोलीसांना माहिती दिली.

हेही वाचा - कोविड रूग्णांना मारहाण करत रुग्णालयाची नासधुस; तिघांना अटक

घटनास्थळी नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व सारंगखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे हे पथकासह दाखल झाले. यावेळी त्यांनी दुकानाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्हीत दुकानातून सोने चोरून नेणारा चोरटा कैद झाला आहे. याबाबत नरेंद्र सोनार यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - पोटाची भूक आता भय मानायला तयार नाही; रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर

ही चोरी चोरट्यांनी पूर्वनियोजित कट रचून केल्याचे समोर येत आहे. नरेंद्र सोनार हे दुकानात असताना दोन जणांनी दुचाकीवर येऊन राममंदिर कुठे आहे, असे विचारले होते. या वेळी, सोनार त्यांच्या वडिलांना दुकानात बसवून मी मंदिर दाखवायला येतो, मला घरी जेवायला तिकडेच जायचे आहे, असे सांगून त्यांना मंदिर दाखवण्यास गेले. मंदिर दाखवून ते घरी जेवायला गेले. त्या अज्ञातांनी पुन्हा दुकानाकडे येऊन ही चोरी केली. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना झाले आहेत. याच दुकानात तीन वर्षांपूर्वी असाच चोरीचा प्रकार घडला होता. दुकानात आलेल्या चोरट्याने अशाच प्रकारे पाचशे रुपयांची नोट अंगावर फेकून दीड लाखाचे दागिने चोरून नेले होते.

Last Updated : Sep 23, 2020, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.