ETV Bharat / state

नवापूर तालुक्यात सागाची तस्करी; वाहनासह लाकूडसाठा जप्त

नवापूर तालुक्यातील मौजे जामतलाव रस्त्यावर ताज्या तोडीचे अवैध साग लाकूडाने भरलेली गाडी जप्त करण्यात आली. सदर वाहन जप्त करुन शासकीय जीपने दोर बांधून टोचन करुन शासकीय विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे.

author img

By

Published : Jun 20, 2019, 9:11 PM IST

जप्त करण्यात आलेला साग लाकूड

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील मौजे जामतलाव रस्त्यावर ताज्या तोडीचे अवैध साग लाकडाने भरलेले एक वाहन जप्त करण्यात आले आहे. या वाहनाचा चालक वनविभागाची गाडी येताना दिसताच आपले वाहन बंद करून पसार झाला. त्यानंतर हे वाहन शासकीय विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे.

forest department seized the illegal teak wood and took action
जप्त करण्यात आलेले वाहन

नवापूर तालुक्यातील मौजे जामतलाव रस्त्यावर वनविभागाचे कर्मचारी जीपने गस्त घालत असताना पायविहीर रस्त्याने एक वाहन येताना दिसले. कर्मचाऱ्यांना या वाहनाचा संशय आल्याने जामतलाव चौफुलीवर त्यांनी ते वाहन अडविण्यासाठी पवित्रा घेतला. पण वनविभागाची गाडी समोरुन येताना दिसताच गाडीचा चालक लगेच गाडी बंद करुन पळून गेला. वनविभागातर्फे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात साग चौपाट व खैर नग (२० घ.मी.०.८४७) आणि टाटा सुमो कंपनीची विना नंबरची पांढऱया रंगाची गाडीसह ३ लाख ३१ हजार किमतीचा माल मिळाला. यात सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तसेच चिंचपाडा वनक्षेत्रातील नियतक्षेत्र पिंपळा क्र.म.११२ या राखीव वनात सांयकाळी ६ च्या दरम्यान ट्रॅक्टरचा सहायाने नवीन अतिक्रमण क्षेत्रात विना परवानगीने नांगरनी करीत असता, ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदर वाहन नंदुरबार शासकीय विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे. सदर आरोपी विरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील कार्यवाही सुरू आहे.

जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर

Intro:Anchor :- नवापूर तालुक्यातील मौजे जामतलाव रस्त्याने शासकीय जीपने गस्त करीत असता पायविहीर रस्त्याने संशयीत वाहन येत असल्याचे दिसताच जामतलाव चौफुलीवर वाहनास अडवीले असता वाहन चालक वाहन लाँक करुन प्रसार झाला.सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात ताज्या तोडीचे अवद्य साग चौपाट व खैर नग भरलेले आढळून आले.Body:सदर वाहन जप्त करुन शासकीय जीप ने दौर बाधुन टोचन करुन शासकीय विक्री आगार येथे जमा केले.
सदर चा जप्त मुद्देमाल साग चौपाट व खैर नग २० घ.मी.०.८४७ व टाटासुमो कंपनीची विना नंबरची पांढर्या रंगाचे वाहन सह किंमत ३लाख ३१ हजार माल मिळुन आला. गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु आहे.
Conclusion:तसेच चिंचपाडा वनक्षेञातील नियतक्षेञ पिंपळा क.म.११२ या राखीव वनात सांयकाळी ६ चा दरम्यान ट्रँक्टरचा सहायाने नविन अतिक्रमण क्षेञात विना परवानगीने नागरनी करीत असता ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.सदर वाहन नंदुरबार शासकीय विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे.सदर आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील कार्यवाही सुरु आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.