ETV Bharat / state

बेलीपाडा अस्वल हल्ला: वनविभागाने लावले 3 ट्रॅप कॅमरे अन् 1 पिंजरा - बेलीपाडा वन विभाग न्यूज

बेलीपाडा येथे अस्वलाने हल्ला करुन तीन तासांच्या कालावधीत तीन नागरिकांना जखमी केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळोदा वनविभागाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अस्वलाने हल्ला केलेल्या परिसरात 3 ट्रॅप कॅमरे आणि एक पिंजरा लावण्यात आला आहेत.

Bear
अस्वल
author img

By

Published : May 22, 2020, 10:40 AM IST

नंदुरबार - तळोदा तालुक्यातील बेलीपाडा येथे गुरुवारी अस्वलाने हल्लाकरून 3 जणांना जखमी केल्याची घटना घडली. या अस्वलाने पुन्हा हल्ला करू नये यासाठी वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याठिकाणी तीन ट्रॅप कॅमरे आणि एक पिंजरा लावला आहे.

अस्वलासाठी वनविभागाने लावलेला पिंजरा
अस्वलासाठी वनविभागाने लावलेला पिंजरा

बेलीपाडा येथे अस्वलाने हल्ला करुन तीन तासांच्या कालावधीत तीन नागरिकांना जखमी केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळोदा वनविभागाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अस्वलाने हल्ला केलेल्या परिसरात 3 ट्रॅप कॅमरे आणि एक पिंजरा लावण्यात आला आहेत. तसेच वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी दिवसभर संपूर्ण परिसरात गस्त घातली.

वनविभागाच्या अधिकार्‍यांनी बेलीपाडा येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी उपवनसंरक्षक एस. बी. केवटे, सहायक उपवनसंरक्षक ई. बी. चौधरी, वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल व्ही. एस. माळी, वनरक्षक आर. जे. शिरसाठ, अंबिका पाटील, श्रावण कुंवर आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.