ETV Bharat / state

Food Poisoning in Nandurbar : नंदुरबारमध्ये फराळातून 135 व्यक्तींना विषबाधा - नंदुरबारमध्ये फराळातून 135 व्यक्तींना विषबाधा

नंदुरबारमध्ये फराळातून 135 व्यक्तींना विषबाधा ( Food Poisoning in Nandurbar ) झाल्याची घटना घडली. नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले होते.

Food Poisoning in Nandurbar
नंदुरबार
author img

By

Published : Mar 2, 2022, 10:49 AM IST

नंदुरबार - नंदुरबार तालुक्यातील राकसवाडा येथे उपवासाच्या फराळ वाटप करण्यात आला. यातून गावातील सुमारे 135 व्यक्तींना अचानक पोटात त्रास होऊ लागला व उलट्या झाल्याने त्यांना राकसवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. अजय विंचूरकर यांनी तपासणी केली असता त्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. विषबाधा झालेल्या रुग्णांना राकसवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आला.

फराळातून 135 व्यक्तींना विषबाधा -

नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांनी फराळाचा लाभ घेतल्यानंतर सुमारे 135 व्यक्तींना विषबाधा झाली. यात महिला व बालकांचा समावेश होता. विषबाधा झालेल्या रुग्णांना तत्काळ राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले. यापैकी 40 रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून किरकोळ बाधा झालेल्या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकारी घटनास्थळी दाखल -

राकसवाडा येथे फळातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी नंदुरबार तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य आधिकारी जाफर तडवी, वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय विंचुरकर, डॉ. उर्वशी वळवी रुग्णालरात दाखल झाले. यावेळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.जाफर तडवी यांनी रुग्णांची विचारपुस केली.

हेही वाचा - Russia-Ukraine war LIVE Updates : युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावास बंद, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.