ETV Bharat / state

Nandurbar Earthquake News : नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के - Earthquake in Nandurbar district

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले असल्याची चर्चा सुरू होती. सावळदा येथील भूकंपमापन केंद्रावर माहिती जाणून घेण्यासाठी तेथील अधिकारी दिलीप जाधव यांच्याशी माध्यमांनी चर्चा केली. सावळदा तालुका शहादा येथिल केंद्रातही भूकंपाची नोंद झाली आहे.

Nandurbar Earthquake
भूकंपाचे सौम्य धक्के
author img

By

Published : Feb 20, 2023, 11:06 AM IST

नंदुरबार : जिल्ह्यात काही ठिकाणी विशेषतः शहादा तालुक्यातील काही नागरिकांना अचानक जमीनीत हलके कंपने जाणवल्याची चर्चा सुरू होती. जमीन हालत असल्याचे अनुभवास आल्यानंतर हा धक्का भूकंपाचा धक्का आहे, अशी चर्चा सुरु झाली. परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर माध्यमांनी भूकंपमापन केंद्रावर असलेले दिलीप जाधव यांनी माहिती दिली. त्यावेळेस त्यांनी सांगितले की, १२ वाजून ५४ मिनिटांनी मध्य प्रदेश स्थित बडवाणी येथे केंद्रबिंदू असलेले भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याच्या परिणाम धार जिल्हा, अलीराजपुर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यात याच्या कुठेही परिणाम झालेला नाही. भूकंपाची तीव्रता २.८ रिक्त स्केल एवढी असल्याचे खात्री त्यांनी दिली.

गतवर्षाचा भूकंपाचा इतिहास : गतवर्षी २ जानेवारी २०२१ ला ४.४ रिश्‍टर स्केलचा, त्यानंतर २४ जानेवारी ३.५ रिक्तर स्केल, ११ ऑगस्ट २०२१ ला ३.७ व आज बडवाणी केंद्रबिंदू आसलेला २.८ रेक्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात पाहिले तिन्ही भूकंपाचे केंद्रबिंदू पालघर होते. त्यातील काही धक्के शहादा येथे जाणवले होते. गुजरात राज्यात नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवर या महाकाय प्रकल्पाचा भूकंप केंद्रबिंदू शहादा असल्याने राज्य शासनाने सावळदा तालुका शहादा येथे भूकंप मापन केंद्र कार्यान्वित ठेवले आहे. भूगर्भातील सर्वच हालचालींची नोंद येथील मशीनवर घेण्यात येते. त्याची माहिती गुजरात व महाराष्ट्र राज्याला दिली जाते. महसूल विभाग या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी रविवारी २.८ रिश्टर स्केलच्या भूकंप झाल्याची नोंद सावळदा तालुका शहादा येथे असलेल्या भूकंपमापन केंद्रात झालेली आहे, अशी माहिती दिली.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : शहादा तालुक्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असतील. मात्र भूकंपाचा केंद्रबिंदू हा मध्यप्रदेश येथील बडवाणी असुन येथिल धार, आलीराजपुर या जिल्ह्यांमध्ये शहरात व ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. येथे नागरिकांनी भयभीत होऊ नये, त्याचप्रमाणे अफवांवर विश्वास ठेवू नये. भूकंपाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. झालेल्या भूकंपाच्या केंद्र बिंदू हा मध्यप्रदेश येथील बडवाणी आहे. जिल्हा प्रशासन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा : Nashik News : कोरोना काळातील ऑक्सिजन प्रकल्प धूळखात पडून, करोडो रुपये पाण्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.